बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं. अथिया क्रिकेटपटू केएल राहुलबरोबर लग्नबंधनात अडकली. आता सुनीलने मुलगी अथियाला नातं यशस्वीरित्या टिकवण्यासाठी सल्ला दिला आहे. तर त्याने जावई केएल राहुलला इशारा दिला आहे. सुनीलने लेक व जावयाला नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊयात.

“मी स्त्रियांचा फक्त सेक्ससाठी वापर करतो”, राम गोपाल वर्मांनी ‘त्या’ प्रश्नावर अभिनेत्रीला दिलेलं उत्तर

सुनील शेट्टीने ‘मिड डे’ला मुलाखती दिली. या मुलाखतीत आयुष्यात चढ-उतार येतात, पण या चढ-उतारांनी नाती कमकुवत होऊ नयेत तर ती मजबूत व्हायला हवीत, असा सल्ला त्याने मुलीला दिला. “कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. कारण केएल राहुल हा खेळाडू असून त्याला कामासाठी बाहेर जावं लागते. अशा परिस्थितीत तो पूर्ण वेळ तिला सोबत नेऊ शकत नाही. म्हणूनच अथियाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण अभिनेत्यांप्रमाणेच खेळाडूंच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार येत असतील,” असं सुनील शेट्टी म्हणाला.

“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”

दुसरीकडे सासरे सुनील शेट्टी यांनी जावई केएल राहुलला इशारा दिला. “इतकाही चांगला बनू नकोस की तुझ्यासमोर बाकीचे हीन वाटतील,” असं सुनील केएल राहुलला म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अथिया व राहुल एकमेकांना बराच काळ डेट करत होते. यावर्षी २३ जानेवारी २०२३ रोजी दोघांनी खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते.