२०२३ हे वर्षं जसं शाहरुख खानसाठी जितकं महत्त्वाचं होतं तितकंच देओल परिवारासाठीही महत्त्वाचं होतं. नुकताच बॉबी देओलची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. याआधी धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्याही आधी सनी देओलने ‘गदर २’मधून बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. खऱ्या अर्थाने सनी देओलने ‘गदर २’ पासून बाजी मारायला सुरुवात केली, पण आता मात्र सनी देओल हरवल्याची चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’प्रमाणेच प्रभासच्या ‘सालार’वरही चालली सेन्सॉरची कात्री; चित्रपटाला मिळालं ‘A’ सर्टिफिकेट

What happens to the body if you have potatoes daily
तुम्हाला बटाटा भजी, फ्रेंच फ्राईज खायला आवडतात का? रोज बटाटा खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Hyderabad man faints from laughing too hard How is it possible
खूप हसल्यामुळे हैदराबादमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध; पण हे कसे शक्य? तज्ज्ञांनी केला खुलासा
Ever wondered why some leftover foods taste better the next day but not all read what nutrition said
भाजी, डाळ शिळी झाल्यावर आंबट लागते; पण चिकन, मच्छी करीची चव वाढते, असे का? तज्ज्ञांकडून ऐका नेमकी प्रक्रिया
गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
Drivers Life Saved Because Of Helmet video
हेल्मेटनं मृत्यू रोखला; भर रस्त्यातला अपघाताचा VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका!
Tiger Died
जंगलातून भरधाव जाणाऱ्या कारची वाघाला जोरदार धडक; पाय मोडल्यानंतरही बिचाऱ्याची तंगडतोड, पण… हृदयद्रावक Video व्हायरल
Ghatkopar hoarding collapse marathi news
फलक लावण्यात येणाऱ्या जागेच्या स्थैर्याचा मुद्दा दुर्लक्षितच, घाटकोपरच्या घटनेनंतर मुद्दा उपस्थित
Instagram down
हॅक नाही डाऊन! फेसबुक, इन्स्टाग्राम लॉग इन करताना अडचणी आल्याने नेटकऱ्यांची ‘एक्स’कडे धाव

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर दारू पिऊन झिंगत चालत असल्याचा सनीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, परंतु तो खरा नसून चित्रपटातील एक सीन असल्याचं त्याने स्पष्ट केलं. आता सनी हरवला असल्याची पोस्टर्स सोशल मीडियावर झळकू लागली आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे. इतकंच नव्हे तर ही पोस्टर्स सनीच्या मतदारसंघात पाहायला मिळाली आहेत. सनी जेवढा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे तितकीच मतदार संघात त्याच्यावर टीका होताना पाहायला मिळते.

सनी देओल हा गुरुदासपूर मतदार संघातून खासदार आहे. निवडणूका झाल्यापासून सनी त्याच्या मतदार संघात फिरकलाही नसल्याची तक्रार तिथल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. “आमचे खासदार हरवले आहेत, त्यांना शोधून देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीसही देण्यात येईल” अशा आशयाची पोस्टर्स गुरुदासपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. या फोटोवर लोकांनीही भन्नाट कॉमेंट केल्या आहेत.

याआधीही मतदार संघाकडे कानाडोळा केल्याने सनीवर टीका झाल्याचं समोर आलं आहे. गुरुदारपूर-पठाणकोटमधील एका बसस्टँडवर सनी देओल बेपत्ता असल्याची ही पोस्टर्स झळकली आहेत. इतकंच नव्हे तर प्रवाशांनादेखील ही पोस्टर्स वाटली आहेत. ‘गदर २’च्या घवघवीत यशानंतर सनी देओलची क्रेझ पुन्हा वाढली आहे. सनी लवकरच आता राजकुमार संतोषी यांच्याबरोबर चित्रपटात काम करणार आहे, शिवाय या चित्रपटात सनीसह आमिर खानही दिसणार असल्याची चर्चा आहे.