सबा आझाद हृतिक रोशनबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने तिची अनेकदा चर्चा होत असते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि गायिका म्हणून ती प्रसिद्ध आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा रोमान्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. दोघंही अनेकदा बॉलिवूड पार्ट्या, एअरपोर्ट, लंच किंवा डिनरसाठी एकत्र दिसतात. तिने स्वतःच्या वाढदिवसानंतर हृतिक बरोबरच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

या व्हिडीओच वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडीओवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानने या व्हिडीओवर कॉमेंट केली आहे. तिने कॉमेंटमध्ये लिहले, ‘देवाचा तुम्हा दोघांवर आशीर्वाद राहो साबू’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हृतिकने सबाला वाढदिवसाच्या निमित्ताने फुले पाठवली होती त्याचा उल्लेख सबाने पोस्टमध्ये केला आहे तसेच हृतिकचे तिने आभार मानले आहेत.

जान्हवी कपूरने खरेदी केलं मुंबईत घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

सबा आझाद आणि हृतिक रोशन त्यांच्या नात्याबद्दल फार गंभीर असून दोघंही लग्नाचा विचार करत आहेत असं बोललं जातंय. हृतिकच्या चित्रपटांची जशी चर्चा होते तशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत असते. अभिनेत्री-गायिका सबा आझादला तो डेट करत आहेहृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सुझानने कौतुक केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक रोशन सुझान खान यांनी बरीच वर्षं संसार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. सुझान खानदेखील अर्सलन गोनी याला डेट करत आहे. सुझान अनेकदा सोशल मीडियावर अर्सलनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.