Swatantra Veer Savarkar box office Collection Day 11 : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन ११ दिवस झाले आहेत. २२ मार्च रोजी हा चित्रपट हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रणदीप हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका केली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शकही तोच आहे. या चित्रपटाच्या ११ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी, पाचव्या दिवशी १.१० कोटी रुपये, सहाव्या दिवशी ८६ लाख, सातव्या दिवशी १.१५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने आठव्या दिवशी १.१ कोटी, नवव्या दिवशी १.५ कोटी, १० व्या दिवशी १.७५ कोटी आणि ११ व्या दिवशी ६० लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं ११ दिवसांचं एकूण कलेक्शन १६.३० कोटी रुपये झालं आहे.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

चित्रपट हिंदी व मराठीत प्रदर्शित झाला असला तरी हिंदीचीच कमाई जास्त आहे. या चित्रपटाचं नुकतंच स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनींगला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. त्यांच्याशिवाय अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या चित्रपटाबाबत बोलायचं झाल्यास यात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदीसह मराठी कलाकार चित्रपटाबद्दल पोस्ट करून चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहेत. पण दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचं कलेक्शन होत आहे. या आठवड्यात क्रिती सेनॉन, करीना कपूर व तब्बू यांचा ‘क्रू’ चित्रपट प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट आधी रिलीज झालेल्या इतर चित्रपटांना टक्कर देत आहे.