‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना धर्मांतराद्वारे मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले. केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असून, त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले. या चित्रपटाच्या विषयावरून आणि ट्रेलरमध्ये दाखवल्या गेलेल्या काही दृश्यांवरून या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणत या चित्रपटावर टीका करण्यात येत आहे. आता या चित्रपटात उल्लेख केला गेलेल्या महिलांच्या संख्येत मोठा बदल केला गेला आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर अनेक जण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा चित्रपट’ म्हणत आहेत. चित्रपटाला होणाऱ्या या टीकेमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला ३२००० हा महिलांचा आकडा बदलण्यात आला आहे.

आणखी वाचा : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील ‘या’ १० दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधून जवळपास ३२००० महिला बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. आज या चित्रपटाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मोठा बदल केला गेला. आता त्या जागी असे लिहिण्यात आले आहे की ३ महिलांचा ब्रेनवॉश करून, त्यांचे धर्मांतर करून त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते.

हेही वाचा : Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

तर याबरोबरच सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात १० बदल करण्यास सांगितले आहेत. अदा शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.