‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये महिलांचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये कसे सामील केले जाते हे दाखवण्यात आले आहे. हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण तसे जरी असले तरी चित्रपटगृहात हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना चित्रपटाच्या टीमला अपघात झाला आहे.

अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन काल तेलंगणामधील करीमनगर येथे हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. पण या यात्रेसाठी जात असताना त्यांच्या टीमच्या गाडीला अपघात झाला. टीममधील काही जणांना रुग्णालयात भरती करावे लागले. याबाबत अभिनेत्री अदा शर्मा व सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

आणखी वाचा : सुदीप्तो सेन यांना ‘द केरला स्टोरी’च्या सिक्वेलची ऑफर, दुसऱ्या भागाच्या कथेबद्दल खुलासा करत म्हणाले…

अदा शर्माने ट्वीट करत लिहिले, “आम्ही ठीक आहोत. आमच्या अपघाताची बातमी पसरल्याने बरेच मेसेज आले. आमची संपूर्ण टीम सुखरूप आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि काळजी करण्याचे कारण नाही.”

तर सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले, “तुम्ही आमच्याबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी आम्ही आभारी आहोत. आमच्याबद्दल वाटणारी काळजी व्यक्त करण्यासाठी तुम्ही केलेले फोन आणि मेसेज पाहून आम्ही भारावलो आहोत. आम्ही सर्व सुखरूप आहोत आणि उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होणार आहोत. आम्हाला असाच पाठिंबा देत राहा.”

हेही वाचा : चित्रपटगृहानंतर ‘द केरला स्टोरी’ लवकरच येणार OTT वर! जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार चित्रपट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने ९ दिवसांमध्ये १०० कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण १२० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.