scorecardresearch

Premium

शाहरुख नव्हे तर ‘हा’ बॉलीवूड अभिनेता करणार आर्यन खानच्या ‘स्टारडम’ सीरिजमध्ये कॅमिओ

आर्यन खानच्या‘स्टारडम’वेब सीरिजमध्ये हा अभिनेता करणार कॅमिओ

aryan khan
आर्यन खानच्या‘स्टारडम’वेब सीरिजमध्ये हा अभिनेता करणार कॅमिओ

बॉलीवूड सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यनने अलीकडेच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी आर्यनने एक जाहिरात दिग्दर्शित केली होती. या जाहिरातीत शाहरुख खानने काम केले होते. यानंतर आता आर्यन खान दिग्दर्शित ‘स्टारडम’ नावाची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : लाहोरची संस्कृती, इस्लाम धर्माचा अभ्यास…” ‘गदर’चित्रपटासाठी अमीषा पटेलने घेतली होती प्रचंड मेहनत; म्हणाली…

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

आर्यन खानच्या ‘स्टारडम’वेब सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी मुख्य भूमिका साकारणार असून या सीरिजचे एकूण सहा भाग प्रदर्शित केले जाणार आहेत. या वेब सीरिजच्या मुख्य भूमिकेसाठी तब्बल ८०० ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर लक्ष्य लालवानीची निवड करण्यात आली आहे. सध्या वरळीमधील एका मिलमध्ये या वेब सीरिजची शूटिंग सुरु आहे.

हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटासाठी विकी कौशलने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “दोन आठवडे झोपलो नाही, पण…”

मिड-डेच्या रिपोर्टनुसार आर्यन खान दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर खास कॅमिओ करणार आहे. यासाठी त्याने नुकतेच सेटवर जाऊन शूटिंगही पूर्ण केले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडा वेळ काढत रणबीर कपूर वरळीतील सेटवर आर्यन खानला भेटण्यासाठी आणि शूट करण्यासाठी आला होता.

हेही वाचा : Shark Tank India: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार ‘शार्क टॅंक इंडिया’चा तिसरा सीझन; कसे आणि कुठे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या

‘स्टारडम’वेब सीरिज ओटीटी माध्यमावर रिलीज करण्यात येणार असून यामध्ये आणखी काही बॉलीवूड सेलिब्रिटी कॅमिओ करू शकतात असे सांगण्यात येत आहे. ही वेब सीरिज शाहरुख खान आणि गौरी खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’च्या बॅनरखाली बनवली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 17:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×