एकेकाळची आघाडीची अभिनेत्री व अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं. त्यानंतर ती लेखिका झाली आणि आता तिने तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने ५० व्या वर्षी पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती शेअर केली आहे. अक्षयने पत्नीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे.

अक्षयने लिहिलं, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला पुन्हा शिकायचं आहे, असं सांगितलं होतंस, तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. पण ज्या दिवशी मी तुला एवढी मेहनत करताना पाहिलं तेव्हा मला समजलं की मी एका सुपरवुमनशी लग्न केलं आहे. तू घर, करिअर आणि मुलं तसेच तुझं शिक्षण या सर्व गोष्टी सांभाळल्या. आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी मी हा विचार करतोय की जर मी अजून थोडं शिकलो असतो तर आज माझ्याकडे पुरेसे शब्द असते, ज्या माध्यमातून मी तुला सांगू शकलो असतो की टीना, मला तुझा किती अभिमान वाटतो. खूप अभिनंदन आणि आय लव्ह यू.”

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

ट्विंकल खन्नानेही यासंदर्भात तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या ग्रॅज्युएशन डे ची झलक पाहायला मिळत आहे. “आणि हा आहे माझा ग्रॅज्युएशन डे. गोल्डस्मिथमधला माझा पहिला दिवस असा वाटतो की तो खूप वर्षांपूर्वी आणि काल होता. छान ऊन असलेला दिवस, एक सुंदर साडी आणि माझे कुटुंब माझ्यासोबत असल्याने हा दिवस माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त परफेक्ट बनला,” असं तिने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ट्विंकलने ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’मधून क्रिएटिव्ह अँड लाइफ रायटिंगमध्ये डिग्री पूर्ण केली आहे. अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना या दोघांच्याही पोस्टवर सेलिब्रिटी व चाहते कमेंट्स करून ट्विंकलला शुभेच्छा देत आहेत. या वयात शिक्षण पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं अनेक जण कमेंट्स करून म्हणत आहेत.