‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्यांमुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलीकडेच उर्फीने आपल्या प्रेमाविषयी कबुली दिली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून लाखो मुलींचा क्रश शाहिद कपूर आहे. उर्फीला शाहिद कपूर फार पूर्वीपासून आवडतो, असे तिने जाहीरपणे मान्य केले आहे.

हेही वाचा : आलियाच्या ‘या’ सवयीमुळे रणबीर कपूर होतो नाराज! अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…

उर्फी जावेदने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करीत शाहिद कपूरवरील तिचे प्रेम व्यक्त केले आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने सांगितले की, ती शाहिदच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती, परंतु जेव्हा तिला शाहिदच्या लग्नाबाबत कळले तेव्हा मात्र उर्फी खूप रडली. उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : जॅकलीनच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक! फोटो झाले व्हायरल, अभिनेत्रीने केले असे आवाहन…

२० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहिदच्या ‘इश्क विश्क’ चित्रपटाची आठवण करून देताना उर्फी जावेद म्हणाली, “२० वर्षांपूर्वी ९ मे रोजी जेव्हा इश्क विश्क हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हापासून मी शाहिदच्या प्रेमात पडले. मी १०० डायऱ्यांमध्ये त्याचे नाव लिहिले होते. एवढेच नाही तर शाहिदचे शंभर फोटो सुद्धा मी माझ्या खोलीत लावले होते. जेव्हा मला कळले शाहिदचे लग्न झाले तेव्हा मी खूप रडले. यामुळेच कदाचित मी कोणा दुसऱ्यासोबत आज रिलेशनशिपमध्ये नाहीये कारण, २० वर्षांपूर्वी माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले होते. हा चित्रपट माझ्या आयुष्यात गेम चेंजर ठरला. यामधील संवाद आणि गाणी खूप छान आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
उर्फी जावेद इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, शाहिदने २०१५ मध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला आता मीशा आणि झेन ही दोन मुले आहेत. २० वर्षांपूर्वी ‘इश्क विश्क’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहिद लाखो मुलींचा क्रश बनला होता.