Prem Chopra hospitalized : बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्याबद्दल चाहते काळजी व्यक्त करत असतानाच ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांचीही प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयात आहेत. छातीत जळजळ झाल्यामुळे प्रेम चोप्रांना ८ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर, अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
प्रेम चोप्रा ९० वर्षांचे आहेत. प्रेम चोप्रा यांच्या जावयाने त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. इंडिया टुडेशी बोलताना, प्रेम चोप्रा यांचे जावई विकास भल्ला यांनी सांगितलं की त्यांचे सासरे प्रेम चोप्रा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना वयाशी संबंधित समस्या आहेत. सध्या काळजीचं कोणतंही कारण नाही. वयोमानानुसार त्यांना हा त्रास होतोय. नियमित तपासणी असल्याने जास्त काळजी करण्यासारखं काही नाही.
प्रेम चोप्रा हे चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे चित्रपट करिअर जवळजवळ सहा दशकांचे होते. त्यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.
प्रेम चोप्रा यांचे गाजलेले चित्रपट
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. नकारात्माक भूमिकांद्वारे पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या निवडक कलाकारांमध्ये त्यांचा समावेश आहे. ‘वो कौन थी?’ (१९६४) मध्ये त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्याचबरोबर ‘तीसरी मंझिल’ (१९६६), ‘उपकार’ (१९६७), ‘बॉबी’, ‘दो रास्ते,’ (१९६९), ‘गुप्त’ (१९९७), ‘कोई मिल गया’ (२००३), ‘बेताब’, ‘मिर्च’, ‘लूट’, ‘लव्ह यू…मिस्टर कलाकार!’, ‘पटियाला हाउस’, ‘जाने भी दो यारों’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
