scorecardresearch

Premium

‘सॅम बहादूर’ च्या निर्मात्यांना मोठा झटका; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन लीक, कमाईवर परिणाम होणार?

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘सॅम बहादूर’ Piracyचा शिकार, काही तासांतच ऑनलाइन झाला लीक

sam-bahadur film leaked-online
'सॅम बहादूर' ऑनलाईन लीक

विकी कौशल आणि सान्या मल्होत्रा ​​यांच सॅम बहादूर हा चित्रपट आज (१ डिसेंबरला) चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने लाखोंची कमाई केली आहे. बहुचर्चित असलेला ‘सॅम बहादूर’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

हेही वाचा- Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

case registered, extortion, businessman, offensive videos, mumbai
आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
217 houses sold in Thane property fair
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री
pune Protest FTII Hindutva organization National Cinema Museum I am Not the River Jhelum Screening
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन : ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध
Investors adopted a cautious stance in the backdrop of monetary policy by the Reserve Bank
पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद

मात्र, चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी ‘सॅम बहादूर’च्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. ‘सॅम बहादूर’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिलरॉकर्स, मूवीरुलज़, तमिलएमवी, फिल्मीज़िला, इबोम्मा सारख्या पायरसी साइट्सवर हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणम होण्याची शक्यता आहे.

‘सॅम बहादुर’ चित्रपटात विकी कौशलसह अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना यांची प्रमुख भूमिका आहे. विकीने या चित्रपटात भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारली आहे. तर सान्या मल्होत्राने सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेख हिने या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal sam bahadur film leaked online in few hours after released dpj

First published on: 01-12-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×