अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचा समारोप झाला आहे. रविवारी (३ मार्च रोजी) रात्री काही खास परफॉर्मन्स झाले आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता झाली. तिसऱ्या दिवशी या कार्यक्रमाला बच्चन कुटुंबाने हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली. आधीच्या दोन दिवशी कार्यक्रमात बच्चन कुटुंब नसल्याने चर्चा होत होती, पण तिसऱ्या दिवशी ते जामनगरला अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगला पोहोचले.

अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व लेक आराध्या, श्वेता बच्चन नंदा आणि तिची मुलं अगस्त्य व नव्या नवेली या सर्वांचा जामनगरमधील एकत्र व्हिडीओ समोर आला आहे. सर्वांनी तिसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि रात्रीच ते जामनगरहून मुंबईला रवाना झाले. ‘फिल्मिग्यान’ व ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या पापाराझी अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

भर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

व्हिडीओमध्ये सगळे एकापाठोपाठ एक असे एकत्र जाताना दिसतात, पण जया बच्चन मात्र हसत एकट्याच पुढे निघून गेल्याचं व्हिडीओत दिसतंय.

पारंपरिक पोशाखामध्ये बच्चन कुटुंबीय खूपच छान दिसत होते. यावेळी बिग बींनी कुर्ता आणि जया बच्चन यांनी साडी नेसली होती. ऐश्वर्या, अभिषेक व आराध्याने ऑफ व्हाइट रंगाच्या विविध शेड्सचे कपडे या प्री-वेडिंगसाठी निवडल्याचं पाहायला मिळालं. तर, नव्या नवेली लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. श्वेता बच्चन नंदाने कुर्ता परिधान केला होता, तर अगस्त्य इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये होता.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मध्यंतरी ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या खूप अफवा होत्या, त्यावर अभिषेक किंवा ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आधी अगस्त्य नंदाच्या चित्रपटासाठी आणि त्यानंतर आता अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी बच्चन कुटुंब एकत्र दिसलं.