बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या चांगलाच चर्चेत आहे. विक्रांत लवकरच बाबा होणार आहे. विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. विक्रांत व शीतल यांच्या लग्नाच्या वर्षभरानंतर पालक होणार आहेत. या आनंदाच्या बातमीनंतर चाहते विक्रांतच अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा-हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्तांना आमिर खानचा मदतीचा हात; २५ लाख रुपये केले दान

विक्रांतने इन्स्टाग्रामवर बायको शीतल ठाकूर बरोबरचा त्यांच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर तीन सेफ्टी पिनांचा एक फोटो जोडण्यात आला आहे. ज्याच्यामध्ये एका सेफ्टीपिनच्या पोटात आणखी एक छोटी सेफ्टी पिन दाखवण्यात आली आहे. विक्रांतने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही पालक बनणार आहोत. २०२४ मध्ये आमचं बाळ येणार आहे. आमचा नवा प्रवास सुरू झाला आहे.” असेही विक्रांतने लिहिले आहे. विक्रांतच्या या गोड बातमीनंतर चाहत्यांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. अभिनेत्री गौहर खान, हुमा कुरेशी, मौनी रॉय यांनी त्याचे अभिनंदन केले आहेत.

विक्रांत आणि शीतलने १८ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत होते. ७ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रांतचा वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर, मिर्झापूर वेबसिरीजमधील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या वेबसिरीजमध्ये त्याने बबलू पंडितची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो ‘मुंबईकर’मध्ये दिसला होता. लवकरच तो विधू विनोद चोप्रांच्या ‘१२वी फेल’ तसेच तापसी पन्नूबरोबर ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि मौनी रॉयबरोबर ‘ब्लॅकआउट’मध्ये दिसणार आहे.