भारतीय क्रिकेटर विराट कोहली मैदानावरील धुव्वाधार खेळीने चाहत्यांची मनं जिंकतो. मैदानाबाहेरही विराट त्याच्या फॅशन व हटके स्टाइलमुळे कायमच चर्चेत असतो. विराटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विराट बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह डान्स करताना दिसत आहे. एका ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहली व सोनाक्षी सिन्हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट व सोनाक्षी आर राजकुमार चित्रपटातील साडी के फॉल सा गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील हा व्हिडीओ असल्याचं म्हणण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये विराट सोनाक्षीसह गाण्याच्या हूकस्टेप करताना दिसत आहे. हेही वाचा>> राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्राजक्ता माळीचं एका शब्दात उत्तर, म्हणाली… सोनाक्षी व विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आत्तापर्यंत या व्हिडीओला ५७ हजांराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रोहित शर्माने २०१५मध्ये रितिका सजदेहसह लग्नगाठ बांधली. मुंबईत त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रोहितच्या रिसेप्शन सोहळ्याला क्रिकेटसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 'साडी के फॉलसा' गाण्यावर सोनाक्षी सिन्हासह विराट कोहलीने केलेला भन्नाट डान्स, 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल दरम्यान, विराह कोहली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर २०१७ साली विवाहबंधनात अडकला. विरुष्काच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. विराट व अनुष्काला एक मुलगी असून तिचं नाव वामिका असं आहे.