राज्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. राज्यातील ज्या थिएटर्सच्या स्क्रीनवर चित्रपट दाखवला जात आहेत, तिथून चित्रपट हटवा, असं त्या आदेश देताना म्हणाल्या. यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’चा उल्लेख करत टीका केली होती. त्यावर काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदी; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आदेश, म्हणाल्या…

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Devendra fadanvis calrification on Uddhav Thackeray statement
‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”
Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”

“द काश्मीर फाईल्स म्हणजे काय? हा चित्रपट एका विभागाचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे काय?… ही रंगवलेली कथा आहे,” असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश देताना म्हणाल्या. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी, माझ्याबद्दल बोलत आहेत, असा माझा अंदाज आहे. होय, मी बंगालमध्ये खिलाफतने भडकावलेल्या डायरेक्ट अॅक्शन डे नरसंहारातून वाचलेल्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो. तुम्ही का घाबरताय? ‘द काश्मीर’ फाइल्स हा नरसंहार आणि दहशतवादाबद्दलचा होता. काश्मिरी लोकांची बदनामी होते, असं तुम्हाला कशाच्या आधारावर वाटतंय? एखाद्या राजकीय पक्षाकडून चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी दिला जातो, असं तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता?मी तुमच्याविरुद्ध मानहानीचा खटला आणि नरसंहार नाकारण्याचा खटला का दाखल करू नये? तुम्ही ज्याबद्दल बोलताय त्या चित्रपटाला ‘द दिल्ली फाइल्स’ म्हणतात ‘बंगाल फाईल्स नाही’ आणि कोणीही मला गप्प करू शकत नाही,” असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, तमिळनाडूनंतर पश्चिम बंगालमध्येही वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. ममता बॅनर्जींनी चित्रपटावर बंदीचे आदेश दिल्यानंतर त्यावर राजकीय स्तरावरूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.