Waheeda Rehman गुरु दत्त हे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी आणि कलासक्त अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार होते. वहीदा रहमान आणि गुरु दत्त यांची जोडी चांगलीच पसंतीस उतरत होती. या दोघांनी ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटांमध्ये काम केलं. गुरु दत्त यांची आज जन्म शताब्दी आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी गुरु दत्त यांनी स्वतःला संपवून घेतलं. १० ऑक्टोबर १९६४ ला पेडर रोड या ठिकाणी असलेल्या त्यांच्या बंगल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान वहीदा रहमान यांनी त्यांची साथ सोडली होती. त्याबाबत आता इतक्या वर्षांनी त्यांनी भाष्य केलं आहे.

कागज के फूल चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी काय घडलं?

कागज के फूल चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी काय घडलं? असं विचारलं असता वहीदा रहमान म्हणाल्या, ” १९५९ मध्ये ‘कागज के फूल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी माझं लग्न झालं. गुरु दत्त यांनी त्यावेळी त्यांच्या बंगल्यात एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी के. आसिफ, बिमल रॉय, मेहबुब हे सगळे उपस्थित होते. रात्रीच्या जेवणानंतर रवी शंकर आणि विलायत खाँ साहेब यांची जुगलबंदीही पार पडली. तसंच कागज के फूलमधले काही निवडक सीनही दाखवले गेले. लोकांना हा चित्रपट आवडल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे गुरु दत्त खुश होते. एका प्रेक्षकाने तर माझ्या भावाला सांगितलं होतं की आणखी वहिदा रेहमान यांच्यासाठी आणखी कपाटं बनवून घ्या कारण तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी आहेत ती कपाटं कमी पडणार आहेत. पण काय घडलं माहीत नाही काहीतरी घडलं ज्याचा परिणाम गुरुदत्त आणि कागज के फूल दोहोंवर झाला.”

कागज के फूल सिनेमा चालला नाही त्याच्या वेदना गुरु दत्त यांना झाल्या

गुरु दत्त यांनी एका दिग्दर्शकाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट तयार केला होता. मात्र चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर चालला नाही तेव्हा गुरु दत्तना खूप वेदना झाल्या. त्यांनी या चित्रपटासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. हा सिनेमा त्यांच्याच आयुष्यावर असावा. हा सिनेमा चालला नाही त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. त्यांना हरल्यासारखं वाटत होतं त्यामुळे या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपट बनवणं काही काळासाठी सोडून दिलं. ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट कागज के फूल नंतर आठ महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. मात्र त्या चित्रपटाला चांगलं व्यावसायिक यश मिळालं. हा चित्रपट त्या काळी १६ लाख रुपयांमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाची पहिल्या १८ आठवड्याची कमाई ४८ लाख रुपये झाली होती. अशी माहिती वहीदा रहमान यांनी दिली. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ही सगळी माहिती त्यांन दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Guru Dutt Birth 100th Birth Anniversary
गुरु दत्त यांची आज जन्मशताब्दी (फोटो-इंडियन एक्स्सप्रेस)

वहीदा रहमान यांनी का सोडली गुरु दत्त यांची साथ?

वहीदा रहमान यांनी का सोडली गुरु दत्त यांची साथ? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की पैसे हे एक कारण होतं. त्या काळात कलाकारांना महिन्याला पगार दिला जात असे. वहिदा रेहमान यांना दर महिन्याला डीच हजार रुपये मिळत. ते तयांना कमी वाटत होते. त्यामुळे त्यांनी गुरु दत्त यांची साथ सोडली. तसंच त्यांचे काही मतभेदही झाले होते. गुरु दत्त यांना वहीदा रहमान आवडू लागल्या होत्या. पण त्यांना गुरु दत्त यांच्याशी लग्न करायचं नव्हतं. या कारणामुळेही वहीदा रहमान या गुरु दत्त यांच्यापासून दूर झाल्या.