‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून अवघ्या सोळा दिवसांत चित्रपटाने १८७ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. सध्या या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या चित्रपटावर होत असलेल्या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेला नवा विषय मिळाला असून, केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे. दरम्यान, चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.

हेही वाचा : गुजरातच्या गावामध्ये अमिताभ बच्चन यांची नात चालवतेय ट्रॅक्टर; नेटकरी कौतुक करीत म्हणाले…

चित्रपटाचे निर्माते विपुल शाह म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही बंगालमध्ये चित्रपटावर बेकायदेशीर बंदी घालण्यात आली आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. बुकिंग खिडक्या उघडल्यात, तर तुमचे थिएटर सुरक्षित राहणार नाही, अशा धमक्यांचे फोन चित्रपटगृहांच्या मालकांना पोलीस प्रशासनाकडून येत आहेत.

हेही वाचा : सैफच्या लेकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, सारा अली खान खुलासा करीत म्हणाली…

विपुल शाह पुढे म्हणाले, “हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असून चित्रपटगृहांचे मालक मिळणाऱ्या धमक्यांविषयी उघडपणे प्रतिक्रिया देत नाहीत. हा चित्रपट दाखवण्याची त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना परवानगी दिली जात नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असे प्रकार घडणे अतिशय चुकीचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’फेम अश्विनी महांगडे पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत, पोस्ट शेअर करीत म्हणाली…

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असून लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.