परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून ते अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. मूळचे गुजराती असलेल्या परेश रावल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत आहे. त्या माजी मिस इंडिया आहेत. त्यांच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. परेश व स्वरूप यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

परेश व स्वरूप यांना आदित्य व अनिरुद्ध नावाची दोन मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. परेश यांची मुलं अभिनय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा मुलगा आदित्य रावल याने २०२० मध्ये ‘बमफाड’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि अनिरुद्ध रावलने ‘सुल्तान’ (२०१७) मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. तसेच ‘टायगर जिंदा है’ (२०१७) चित्रपट आणि ‘स्कूप’ (२०२३) या सीरिजमध्ये काम केलंय. आपण मुलांना या क्षेत्रात येण्यासाठी मदत केलेली नाही, असं परेश सांगतात.

“माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्टइतका…”, परेश रावल यांनी केलेले विधान चर्चेत

“माझी मुलं त्यांच्या आवडीनुसार काम करत आहेत. जोपर्यंत ते चुका करत नाहीत तोपर्यंत ते शिकणार नाहीत. त्यांनी मला येऊन विचारलं तरच मी सल्ला देईन. त्यांनी मला विचारलं नाही तर मी त्यांना काहीही सांगत नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या. त्यांना चुका करू द्या, त्यांना स्वतः शिकू द्या यावर माझा विश्वास आहे. पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे, ते खूप मेहनती आणि खूप हुशार आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी माझ्या नावाचा वापर केलेला नाही,” असं परेश नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेपोटिझमच्या वादावर प्रतिक्रिया देत हा सगळा फालतूपणा असल्याचं परेश रावल म्हणाले आहेत.