कलाकार मंडळींनी खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यासमोर केलेली एखादी कृती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. असंच काहीसं कित्येकदा बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींबरोबरही घडताना दिसतं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका व पती निक जोनस कायमच चर्चेत असतात. या दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघंही एकमेकांना उत्तम पाठिंबा देताना दिसतात. दरम्यान प्रियांकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा – “लोन, डाउन पेमेंट, खर्च अन्…” वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, म्हणाला, “भीती होती पण…”

प्रियांक निकच्या बऱ्याच कॉन्सर्टला हजेरी लावताना दिसते. आता व्हायरल होणारा व्हिडीओ हा २०१९मधील आहे. युएसमध्ये जोनस ब्रदर्सचं कॉन्सर्ट होतं. निकही या कॉन्सर्टमध्ये गात होता. तर प्रियांका हे सगळे क्षण एण्जॉय करताना दिसली. पण यादरम्यान प्रियांकाने केलेल्या कृत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

कॉन्सर्ट संपलं असताना प्रियांका तिथून बाहेर जात होती. मात्र तिला जमिनीवर पडलेली एक वस्तू दिसली. ही वस्तू म्हणजे एका मुलीचं अंतर्वस्त्र (ब्रा) होतं. कॉन्सर्ट सुरू असतानाच एका मुलीने निकच्या दिशेने अंतर्वस्त्र फेकून मारलं होतं. प्रियांकाचं लक्ष त्याच्यावरच गेलं. पण यावेळी प्रियांकाने काही भलतंच केलं.

आणखी वाचा – दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट; ४५ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री शोधतेय तिसरा जोडीदार, एकटीच करते मुलांचा सांभाळ, म्हणाली, “कधीतरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाने जमिनीवर पडलेलं ते अंतर्वस्त्र उचललं आणि हातात घेऊन फिरवू लागली. त्यावेळी तिला हसू अनावर झालं. तसेच कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेली मंडळीही प्रियांकाकडे पाहत होती. शिवाय प्रियांकाने हे अंतर्वस्त्र हाती घेताच अनेकांनी ती कृती कॅमेऱ्यामध्ये कैद केली. २०१९मधील प्रियांकाच्या या व्हिडीओची आजही चर्चा रंगताना दिसते.