७० आणि ८० च्या दशकात तेव्हाचे आघाडाचे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्या प्रेम कहाणीची बरीच चर्चा झाली होती. सर्वांना वाटत होतं की शत्रुघ्न आणि रीना रॉय लग्न करतील. पण या कहाणीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी रीनाशी नव्हे तर पूनम सिन्हाशी लग्न केलं होतं. रीनाशी सात वर्षांचं अफेअर असूनही त्यांनी लग्नासाठी पूनम यांना निवडलं होतं.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

शत्रुघ्न सिन्हा पूनमकडे जास्त लक्ष देत असल्याचं, जवळीक वाढत असल्याचं रीनाला समजल्यावर आपण पूनमसोबत काम करणार नाही, असं शत्रुघ्न सिन्हांनी सांगितलं होतं. पण, तसं झालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हथकडी’ चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी यांना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्याबद्दल संपूर्ण माहिती होती, कारण ते त्यांचे खास मित्र होते. त्यामुळे जेव्हा ते रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर ‘आंधी तुफान’ हा चित्रपट बनवण्याचा विचार करत होते, तेव्हा रीनांनी त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही तुमच्या मित्राला (शत्रुघ्न सिन्हांना) त्यांचं लग्नाबद्दलचं मत ठरवायला सांगा, कारण त्याने जर लग्नास तयारी दर्शवली नाही तर मी आठ दिवसांत कोणाशीही लग्न करेन.’

“तुमचा भाऊ चांगला दिसत नाही, तरीही…” आदित्य चोप्रांनी उदय चोप्राबद्दल केलेल्या वक्तव्यावर संतापली उर्फी जावेद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलाज यांना हे सांगता रीना यांनी आणखी एक महत्त्वाची अट ठेवली होती. ती अशी की जर शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिले तरच त्या ‘आँधी तुफान’ या चित्रपटात काम करतील, पण शत्रुघ्न सिन्हा यांनी रीनाऐवजी पूनम सिन्हांशी लग्न केलं. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर ‘आँधी तुफान’ या चित्रपटात रीना रॉय यांनी काम केलं नव्हतं.