आज अभिनेत्री रेखा यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या सौंदर्याच्या बाबतीत आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देऊ शकतात. सत्तरच्या दशकामध्ये रेखाजी त्यांच्या कारकीर्दीच्या शिखरावर होत्या. याच काळात अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे नाव जोडण्यात आले होते. त्यांनी या अफेअरच्या चर्चांवर बऱ्याच मुलाखतींमध्ये त्यांचे मत मांडले होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ‘मुकद्दर का सिंकदर’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता.

१९७८ मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या होत्या, “‘मुकद्दर का सिंकदर’चे स्क्रीनिंग सुरु असताना मी प्रोजेक्टर रुममध्ये होते. त्या रुममधून मला संपूर्ण बच्चन कुटुंब चित्रपट पाहत असल्याचे दिसत होते. जया पुढच्या रांगेत बसल्या होत्या आणि ते (अमिताभ) आईवडिलांसह त्यांच्या मागच्या रांगेमध्ये बसले होते. मी त्यांना पाहू शकत होते, पण त्यांना मी दिसणं कठीण होतं. चित्रपटातील रोमँटिक सीन पाहताना त्यांच्या (जया) डोळ्यात पाणी आले असल्याचे माझ्या लक्षात आले.”

आणखी वाचा – Video : “अरे हे तर सार्वजनिक होतंय…” पत्नी जया बच्चन यांची तक्रार ऐकून बिग बी झाले अवाक

त्या पुढे म्हणाल्या होत्या, “एका आठवड्यानंतर त्यांनी (अमिताभ) सर्व निर्मात्यांना ते माझ्यासह यापुढे कोणत्याही चित्रपटामध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे ही बातमी मला सर्वजण सांगत होते.” त्यानंतर अमिताभ आणि रेखा पुन्हा एका चित्रपटामध्ये दिसणार नाही असे सर्वांना वाटले होते. पण ‘सिलसिला’ या चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केले.

आणखी वाचा – Video : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९० मध्ये रेखा यांनी ‘जया आणि माझ्यामध्ये सर्वकाही आलबेल आहे.’ असे सांगितले होते. सिमी अग्रवाल यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या होत्या, “दिदीभाई (जया) खूप प्रौढ विचारांच्या आहेत. त्यांच्यासारखी कर्तुत्ववान स्त्री मी पाहिली नाही. त्यांच्यामध्ये प्रतिष्ठा आहे, एक प्रकारचा क्लास आहे. मला त्यांचा हेवा वाटतो. या तथाकथित अफवा सुरु होण्यापूर्वीपासून आम्ही सोबत होतो. त्या माझ्या दिदीभाई आहेत, राहतील. भविष्यात काहीही घडो त्यात बदल होणार नाही.”