Sushmita Sen Chingaari Movie: बॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स व बोल्ड सीन असतात. अशा सीनचे शूटिंग खूप काळजीपूर्वक व कमी लोकांच्या उपस्थितीत केले जाते. काही वेळा अशा सीन्सचे शूटिंग करताना अनेक अडचणी येतात. अभिनेत्रींना किंवा अभिनेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा अभिनेत्रींबरोबर इंटिमेट सीन करताना सहकलाकार नियंत्रण गमावतात.

एका चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान मिथुन आणि सुश्मिता सेन यांच्यात गैरसमज निर्माण झाला होता. सीनच्या शूटिंगनंतर सुश्मिता रडत पळाली होती. नेमकं काय घडलेलं ते जाणून घेऊयात.

‘चिंगारी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला प्रकार

सुश्मिता सेनने मिथुन चक्रवर्तीबरोबर २००६ मध्ये ‘चिंगारी’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात मिथुन आणि सुश्मिता सेन यांच्यात अनेक इंटिमेट सीन सीन होते. कल्पना लाजमी दिग्दर्शित या चित्रपटात सुश्मिता सेनबरोबर एक इंटिमेट सीन करताना मिथुन चक्रवर्ती यांनी असं काही केलं की त्यानंतर सुश्मिताच्या कृतीमुळे सेटवर उपस्थित सर्वजण हैराण झाले.

जेव्हा चित्रपटात मिथुन आणि सुश्मिता सेनमध्ये इंटिमेट सीन शूट करणं सुरू होतं, तेव्हा तिला ते करताना खूप अस्वस्थ वाटत होतं आणि ती पुन्हा पुन्हा रिटेक घेत होती. टेक फायनल होताच सुश्मिता सेन लगेच तिथून तिच्या व्हॅनिटी व्हॅनकडे रडत पळत सुटली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. जेव्हा दिग्दर्शिका कल्पनाने सुश्मिताला तिच्या या वागणुकीबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मिथुन चक्रवर्तींनी तिच्याबरोबर इंटिमेट सीन करताना नियंत्रण गमावलं आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मात्र, हा तिचा गैरसमज आहे, असं कल्पनाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बातमी बाहेर पसरल्यावर सुश्मिता सेनला आपली चूक लक्षात आली आणि तिने मिथुन यांच्याबरोबरचा गैरसमज दूर केला होता. पुढे या सगळ्या गोष्टी तिथेच संपल्या.