बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण आहे तिचं लग्न. हो, हे खरं आहे. तिसऱ्यांदा राखी सावंत बोहल्यावर चढण्यासाठी तयार झाली आहे. पाकिस्तानच्या लोकप्रिय अभिनेत्याशी तिचं नाव जोडलं गेलं असून लग्नाच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पण , राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करत असलेला पाकिस्तानी अभिनेता कोण आहे? आणि ती तिसऱ्या लग्नाबाबत नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

लोकांचं सतत मनोरंजन करणारी राखी सावंत काही महिन्यांपूर्वी भारत सोडून दुबईला शिफ्ट झाली. त्यानंतर आता राखीने स्वतः तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळेस राखी पाकिस्तानी अभिनेता डोडी खानबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. डोडी खान पाकिस्तानचा एक लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यानं ‘दुर्ज’, ‘घबराना नहीं है’, ‘अखाडा’, ‘चौधरी’ यांसारख्या बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

डोडी खानचे इन्स्टाग्रामवर २४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डोडी संजय दत्तला आदर्श मानतो. त्याला बॉडी बिल्डिंगमध्ये खूप रस आहे आणि त्यामुळे तो बराच वेळ जिममध्ये घालवतो. डोडीने सोशल मीडियावर अनेक जिम ट्रेनिंगचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसंच आता राखी सावंतबरोबर लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून डोडी सतत तिच्याबरोबरचे व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी डोडी खानने राखी सावंतचं प्रपोज स्वीकारत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून डोडीने उमराह पूर्ण करण्यावरून राखीला शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच लग्नाची वरात भारतात आणू की दुबई? लव्ह यू, असं डोडी म्हणाला होता.

दरम्यान, राखी सावंतने खुलासा केला आहे की, लग्न पाकिस्तानमध्ये इस्लामी रिती-रिवाजानुसार होणार आहे. तसंच भारतात रिसेप्शन करणार असून हनीमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नदरलँडला जाणार आहे. तर दुबईत स्थायिक होणार आहेत. याआधी राखी सावंतने दोनदा लग्न केलं होतं. आता हे राखीचं तिसरं लग्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.