Rajesh Khanna-Dimple Kapadia lived Separate without Divorce: बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास सर्वच हिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांचा मोठा चाहता वर्ग होता. खासकरून महिला चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी त्या काळी तुफान गर्दी व्हायची.
राजेश खन्ना यांनी डिंपल कपल यांच्याशी १९७३ साली लग्न केलं होतं. त्यावेळी डिंपल कपाडिया फक्त १६ वर्षांच्या होत्या. ‘बॉबी’ या हिट चित्रपटातून डिंपल यांनी बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात केली होती, तर दुसरीकडे राजेश खन्ना हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार होते.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांच्या वयात १६ वर्षांचं अंतर होतं. लग्नानंतर डिंपल यांनी ट्विंकल खन्ना व रिंकी खन्ना या दोन मुलींना जन्म दिला. मुलींच्या जन्मानंतर या जोडप्याच्या नात्यात दुरावा आला. दोघेही वेगळे राहू लागले, पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. ते जवळपास ३० वर्षे वेगळे राहिले. डिंपल यांनी घटस्फोट दिला नव्हता, त्याबद्दल राजेश खन्ना काय म्हणाले होते, ते जाणून घेऊयात.
९ वर्ष संसार केल्यानंतर एक वेळ अशी आली की राजेश आणि डिंपल यांचं एकत्र राहणं कठीण झालं होतं, तेव्हा त्यांनी १९८२ मध्ये वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. पण इतकी वर्षे वेगळे राहूनही त्यांनी अधिकृतपणे कधीच घटस्फोट घेतला नाही. डिंपल यांनी कधीच राजेश खन्ना यांना कायदेशीररित्या घटस्फोट दिला नाही.

राजेश खन्ना डिंपल यांनी घटस्फोट न देण्याबद्दल काय म्हणाले होते?
१९९० मध्ये आयटीएमबी शोला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना यांनी याबद्दल व्यक्त झाले होते. पुन्हा डिंपल कपाडिया व तुम्ही एकत्र येण्याची काही शक्यता आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणालेले, “पुन्हा एकत्र म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही आधी कुठे वेगळे झालो होतो? आम्ही वेगळे राहतो कारण तिने अजून घटस्फोट दिलेला नाही, ती देत नाही. ती घटस्फोट का देत नाही हे तिलाच ठाऊक, माहित नाही कोणत्या कारणामुळे ती घटस्फोट देत नाही. पण जेव्हा ती येथे व्हँकुव्हरला येईल तेव्हा तिला हे विचारा. ती तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकेल. मी फक्त एवढंच म्हणू शकतो की जर तिने घटस्फोट दिला नाही तर नाही. ती तिची मर्जी आहे.”
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांनी एकत्र फक्त एकाच चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय शिवशंकर’ होता. राजेश खन्ना यांचं १८ जुलै २०१२ रोजी त्यांचा मुंबईतील प्रसिद्ध बंगला ‘आशीर्वाद’ येथे निधन झाले. राजेश खन्ना व डिंपल कपाडिया बरीच वर्षे वेगळे राहिले, पण डिंपल पतीच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर होत्या.