बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी वेगळे आणि हटके विषय असलेले चित्रपट देणारा दिग्दर्शक इम्तियाज अलीने आज या इंडस्ट्रीत स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘लव्ह आज कल’, ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’सारख्या चित्रपटातून इम्तियाज हा एक सर्जनशील फिल्ममेकर म्हणून समोर आला.

नुकतंच इम्तियाजने ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान इम्तियाजने त्याच्या फिल्मी करिअरबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. इम्तियाजचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट चांगलाच गाजला. करीना कपूर व शाहिद कपूर यांची फ्रेश जोडी लोकांनी पसंत केली. या चित्रपटात इम्तियाज अली आधी बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेणार होता ही गोष्ट सर्वश्रुत आहेच, पण याबरोबरच इम्तियाजने या मुलाखतीमध्ये त्याच्या ‘हायवे’ या चित्रपटाशी निगडीतही काही धमाल गोष्टी शेअर केल्या.

आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या फोटोमधून करण जोहरला केलं क्रॉप; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

इम्तियाज म्हणाला, “जब वी मेट हा चित्रपट मी बॉबी देओलला घेऊन करणार होतो, तो माझा चांगला मित्र आहे, याबरोबरच त्याच्या कुटुंबाबरोबर माझे संबंधही चांगले आहेत. ‘सोचा ना था’ हा चित्रपट केल्यावर मी दोन वर्षं काहीच करत नव्हतो. बॉबी माझ्या पुढच्या चित्रपटासाठी होकार देईल व काम सुरू करेल असं मला वाटत होतं, परंतु त्याला मोठ्या निर्मात्यांच्या अन् काही वेगळ्या भूमिका असलेल्या ऑफर्स मिळत होत्या. त्यामुळे शेवटी आम्ही दोघांनी मिळून ‘जब वी मेट’ चित्रपटावर काम बंद केलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच इम्तियाज अलीला ‘हायवे’ हा चित्रपटदेखील सनी देओलला घेऊन करायचा असल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीमध्ये केला. तो म्हणाला, “हायवे हा चित्रपट मला सर्वप्रथम सनी देओलला घेऊन करायचा होता. तो चित्रपटही फार वेगळा होता, तो एक रीवेंज ड्रामा होता. तो चित्रपटही फार वेगळाच झाला असता. मी तो चित्रपट सुभाष घई यांच्याबरोबरही करायचा प्रयत्न केला.” इम्तियाज सध्या त्याच्या आगामी ‘चमकीला’ या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचं संगीत ए.आर. रेहमान यांनी दिलं आहे.