प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते दर्शन जरीवाला यांच्याबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या विरोधात एका महिलेने कोलकाता पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीआहे. ‘गांधी, माय फादर’साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले दर्शन हे ६५ वर्षांचे आहेत. दर्शन यांचे मूल आपल्या पोटात वाढते आहे अन् आपण त्यांच्यामुळेच गरोदर राहिलो असल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. इतकंच नव्हे तर दर्शन यांच्याबरोबर त्यांचा विवाहदेखील झाल्याचं सांगितलं जात आहे.

मीडिया इंडस्ट्रीत काम करणाऱ्या या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे दर्शन जरीवालासोबत गंधर्व लग्न झाले आहे. महिलेने असेही जाहीर केले आहे की तिने न्यायासाठी CINTAA (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) कडे देखील संपर्क साधला आहे. तक्रार करणाऱ्या महिलेची ओळख प्रकरणाची संवेदनशीलता पाहता लपवण्यात आली आहे. या महिलेबरोबर दर्शन यांचं अफेअर होतं इतकंच नव्हे तर दोघांचा ‘गंधर्व विवाह’ झाला असल्याचंही त्या महिलेने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिलेल्या ४०० सीरिजच्या यादीत ‘या’ एकमेव भारतीय वेब सीरिजने पटकावले स्थान

आता गरोदर राहिल्यानंतर दर्शन यांनी हे मूल स्वीकारण्यास नकार दिला असल्याने हे प्रकरण चिघळले असल्याचे तया महिलेने स्पष्ट केले. इतकंच नव्हे तर असोसिएशनमधील अधिकाऱ्याच्या पदावरून दर्शन यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणीही त्या महिलेने केली आहे. ‘गंधर्व विवाह’ म्हणजे कोणत्याही अग्नी किंवा विधीशिवाय परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून एकमेकांना स्वीकारणे. हिंदू धर्मात गंधर्व विवाहाला मान्यता आहे, पण त्याबाबत अनेक वैचारिक मतभेदही आपल्याला पाहायला मिळतात.

ही लढाई आपल्या आत्मसन्मानासाठी असल्याचं त्या महिलेने ‘ईटाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं आहे. दर्शन एक सेलिब्रिटी असल्याने ही लढाई आणखी कठीण होऊ शकते असंही ती महिला म्हणाली आहे. त्या महिलेने पोलिसांसमोर पुरावेदेखील सादर केल्याचं स्पष्ट झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Darshan Jariwalla (@jariwalladarshan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्शन जरीवाला यांची वकील सविना बेदी सच्चर म्हणाल्या की, “दर्शन निर्दोष आहेत. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही दर्शन जरीवाला यांच्याबद्दल कोणतेही अंदाज बांधू नयेत.” अभिनेत्याच्या कायदेशीर तज्ञांनी असा युक्तिवाद केला की खोट्या आरोपांच्या आधारे लोकांना, विशेषतः सेलिब्रिटीजना दुखावण्याचा प्रयत्न केला जातो. कायदेशीर आधारावर हा खटला पुढे लढण्याची दर्शन यांची तयारी आहे. अद्याप दर्शन यांनी स्वतः कुठेच याबद्दल वक्तव्य केलेलं नाही. लवकरच ही केस कोर्टात उभी राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.