चित्रपट प्रेमी असे शब्द तर आपण नेहमी ऐकत असतो. पण दक्षिण भारतात चित्रपट प्रेमी हे या संकल्पनेला वेगळ्याच स्तरावर घेऊन जातात. त्यांच्या आवडत्या कलाकारांचे स्टॅच्यू बनवण्यापासून फर्स्ट-डे-फर्स्ट-शो पाहण्यासाठी असलेली गर्दी तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. अशीच एक अनोखी आणि विचित्र घटना चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत घडली. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्याच्या व्हिडीओ एका नेटकऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे. चेन्नईतील एका चित्रपटगृहात बोनी प्रीमियर शो पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेता कार्तिकेय एका तामिळ चित्रपट ‘वालीमाई’च्या प्रीमियर शो पाहण्यासाठी गेले होते. पण जेव्हा बोनी कपूर तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी एकत्र येऊन त्यांच्या टोयोटो इनोव्हा गाडीवर दूध आणि दही ओतून स्वागत केले.
आणखी वाचा : “माझ्यावर खर्च करण्यापेक्षा…”, ‘झुंड’साठी अमिताभ यांनी केली मानधनात कपात
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
बोनी यांच्या गाडीच्या चारही बाजुला गर्दी होती आणि त्यामुळे तिथून बाहेर पडणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. बोनू कसे तरे गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी चाहत्यांचे अभिवादन केले. त्याच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे मत मांडले आहे. काहींनी हे चुकीचं आहे असं म्हटलं आहे. तर काहींनी याला मुर्खपणा म्हटलं आहे.
आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
‘वालीमाई’ या चित्रपटात अभिनेता अजित कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.