सध्या लॉकडाउन असल्यामुळे घरात बसून लोकांना कंटाळा येऊ नये, त्यांच्या मनोरंजनाचे काही तरी साधन असावे म्हणून ८०च्या दशकातील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवण्यात आल्या. बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तसेच सर्व कलाकारांचे जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो महाभारतातील पांडवांचा स्टायलिस्ट फोटो व्हायरल झाला आहे.
महाभारतातील अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. बी. आर चोपडा यांच्या महाभारतात अर्जुन फिरोज खान, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, समीर चित्रे आणि संजीव चित्रे या कलाकारांनी पाच पांडवांची भूमिका साकारली होती. पण व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्यांचा मालिकेतील लूक नाही तर स्टायलिस्ट आणि अत्यंत कूल लूक समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो १९८९ मधील आहे. हा फोटो शोटाइम मॅगझीनमध्ये पब्लिश झाला होता. त्यावेळी महाभारतातील पाच पांडव प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर होते. अर्जुन हे पात्र अर्जुन फिरोज खान यांनी साकारले होते. तर युधिष्ठिर हे गजेंद्र चौहान यांनी साकारले होते. प्रवीण कुमार यांनी भीम हे पात्र साकारले होते. समीर चितेरा यांनी नकुल आणि संजीव चितेरा यांनी सहदेव हे पात्र साकारले होते. त्यामुळे अर्जुन फिरोज खान, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, समीर चित्रे आणि संजीव चित्रे आजही प्रेक्षकांना मनावर जादू करत आहेत.