ब्राझीलमधील प्रसिद्ध फिटनेस एन्फ्लुएन्सर लॅरिसा बोर्जेसचं निधन झालंय. तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले. तिचं वय ३३ वर्षे होतं. लॅरिसाच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा परसली आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाची पुष्टी केली. तिचं निधन अंमली पदार्थाच्या सेवनाने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लॅरिसाला ग्रामाडोमध्ये प्रवास करताना हृदयविकाराचा झटका आल्याने २० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर ती कोमात गेली, जिथे ती आठवडाभर राहिली. त्यानंतर तिला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आणि तिचे दुःखद निधन झाले. तिच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सनी देओलने आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो; पहिल्या पत्नीला शुभेच्छा देत धर्मेंद्र म्हणाले…
“एवढ्या कमी वयाच्या, अवघ्या ३३ वर्षांच्या दयाळू व्यक्तीला गमावण्याचं दुःख आहे. आम्हाला प्रचंड दुःखात आहोत. तिला गमावल्यानंतर आमला झालेला त्रास आम्ही सांगू शकत नाही,” अशी पोस्ट तिच्या कुटुंबियांनी केली आहे.
लॅरिसाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले आहे. प्राथमिक तपासानुसार तिच्या मृत्यूला अंमली पदार्थांचे सेवन कारणीभूत असू शकते. पण खरं कारण तिच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर समोर येईल.