२९ वर्षीय ब्राझिलियन मॉडेल व एन्फ्लुएन्सर लुआना अंद्राज हिचा मृत्यू झाला आहे. साओ पाउलो येथील रुग्णालयात तिच्या गुडघ्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचे निधन झाले. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर तिला हृदयविकाराचे चार झटके आले.

बालपणी वडिलांनी सोडलं, नंतर पतीने सोडलं आता मुलीही राहत नाहीत सोबत, प्रसिद्ध अभिनेत्रीला कारमध्ये काढावे लागले दिवस

‘मार्का’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रिया सुरू असताना लुआनाचं हृदय तब्बल अडीच तास बंद पडलं, त्यानंतर डॉक्टरांनी फॅट रिमूव्हल प्रक्रिया थांबवली आणि तिला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. तिला हृदयविकाराचे चार झटके झाले, तिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. दरम्यान, लुआनाची वैद्यकीय तपासणी केल्यावर असं दिसून आलं की तिला फुफ्फुस एम्बोलिझमचा त्रास होता, जो थ्रोम्बोसिसशी संबंधित होता.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटलं की शस्त्रक्रियेत व्यत्यय आला, त्यानंतर तिच्या चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात थ्रोम्बोसिस दिसून आले. तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले जेथे तिच्यावर औषधोपचार आणि हेमोडायनामिक उपचार करण्यात आले. पण त्याचा फायदा झाला नाही आणि मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास लुआनाला मृत घोषित करण्यात आले. तिचा बॉयफ्रेंड जोआओ हदादने सोशल मीडियावर पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लुआना अंद्राज ही पॉवर कपल ६ मधील तिच्या कामासाठी आणि ब्राझिलियन टीव्ही शो, डोमिंगो लीगल मधील स्टेज असिस्टंट म्हणून ओळखली जात होती. तिच्या निधनावर फुटबॉलपटू न्येमार यानेही दुःख व्यक्त केलं आहे.