ब्राझीलमधील गायिका मरिलिया मेंडॉन्सा हिचा शुक्रवारी झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मरिलिया तिचा मॅनेजर आणि एका असिस्टंटसोबत एका छोट्या विमानातून प्रवास करत होती. यावेळी झालेल्या विमान दुर्घटनेत तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला. ज्या विमानात तिचा अपघात झाला त्याच विमान प्रवासाचा एक व्हिडीओ मरिलियाने काही मिनिटांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ तिचा शेवटचा व्हिडीओ ठरेल असा विचार तिने स्वप्नाही केला नसावा.

या दूर्घटनेनंतर मरिलियाच्या टीमने एक निवेदन जाहीर केलं असून या निवेदनात निर्माते हेन्रिक रिबेरो, सहाय्यक अबिसिएली सिल्वेरा डायस फिल्हो तसंच विमानाचा पायलट आणि सहवैमानिक दोघांचाही अपघातात मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय. शुक्रवारी प्रवास करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. ती एका शोसाठी गोयानिया शहरातून कॅराटिंगाकडे निघाली होती असं जी 1 या वेबसाइटने म्हंटलं आहे. अपघाताच्या काही तासांपूर्वीच मरिलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती शोसाठी तयारी करताना दिसतेय. तसचं विमानात ब्रेकफास्ट करताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या चार तासांनी तिच्या टीमने मरिलियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे.

“कधी तरी पूर्ण कपडे घालत जा”, बॅकलेस टॉपमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल

मरिलिया ब्राझिलियन संगीत प्रकार “सर्टनेजो” ची आयकॉन म्हणून लोकप्रिय होती. २०१९ सालामध्ये तिने लॅटिन ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं होतं. मरिलियाच्या निधनानंतर ब्राझीलचे राष्ट्रपती जइर बोल्सोनारो यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघाताचा तपास अद्याप सुरु आहे. परंतु सरकारी वीज कंपनी सेमिगने विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते वीज वितरण लाइनला धडकल्याचं निवेदनात म्हंटलं आहे.