बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर-ब्रेकअपच्या अनेक बातम्या समोर येतात. बहुतेक प्रकरणांमध्ये सेलिब्रिटी आपल्या प्रेमसंबंधांबद्दल खुलेपणाने वाच्यता करताना दिसत नाहीत. मात्र अशीही अनेक प्रकरणे आहेत ज्यांमध्ये दोन कलाकारांच्या नातेसंबंधाबद्दल खुलेपणाने माध्यमांमध्ये चर्चा झाली, पण नात्यांमध्ये दुरावा आला तेव्हा त्याची कारणे कोणालाच कळू शकली नाही. अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूर यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. आपल्यापेक्षा १३ वर्षांनी लहान मीराशी लग्न करण्याआधी शाहिद आणि करिना कपूरच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांच्या ब्रेकअपचे कारण कोणालाच कळू शकले नव्हते.
२००४ मध्ये ‘फिदा’ या चित्रपटातून शाहिद आणि करिनाच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. दोघांची पहिल्यांदा या चित्रपटाच्या सेटवरच भेट झाली. या चित्रपटातून शाहिदला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तर त्यावेळी करिना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. असे असतानाही करिनानेच शाहिद कपूरला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने ही गोष्ट सांगितली होती. इतकंच नाही तर अनेक फोन आणि मॅसेज केल्यानंतर शाहिदने तिच्या प्रपोजलला होकार दिल्याचेही तिने सांगितले होते.
वाचा : असा असेल नागार्जुनच्या मुलाचा लग्नसोहळा
पडद्यावरील दोघांची जोडी यशस्वी ठरली नसली तरी रिअल लाइफमधील दोघांच्या प्रेमाचे किस्से खूप चर्चेत होते. ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या नात्याला तडा जाऊ लागला होता. २००६ मध्ये ‘जब वी मेट’ चित्रपटाची शूटिंग सुरू होण्यापूर्वी दोघांमध्ये सर्वकाही ठीक होतं मात्र शूटिंग संपताना दोघांमधील दुरावा वाढला. चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील गप्पा कमी झाल्या होत्या. इतकंच नाही तर शेवटचा सीन शूट करताना दोघेही वेगवेगळ्या गाडीने सेटवर आले. अभिनेत्री अमृता रावसोबत शाहिदची जवळीक वाढल्याच्या कारणाने करिना आणि शाहिदमध्ये दुरावा वाढला असे म्हटले जाते. दुसऱ्या बाजून करिना आणि सैफ अली खानसुद्धा एकमेकांजवळ येऊ लागले होते. २००७ मध्ये जेव्हा करिना ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सैफसोबत दिसली तेव्हा शाहिद-करिनाच्या ब्रेकअपच्या बातमीची खातरजमा झाली.
https://www.instagram.com/p/BOWDCmigS7G/
असे म्हटले जाते की अनेकदा करिनाने शाहिदसोबत पॅचअपसाठी प्रयत्न केले होते. मात्र ब्रेकअपचा शेवटचा कॉलसुद्धा शाहिदनेच केला. ब्रेकअपबद्दल दोघांनी माध्यमांसमोर कधीच खुलेपणाने वाच्यता केली नाही. २०१२ मध्ये करिना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न केलं आणि नुकताच त्यांना एक मुलगाही झाला. तर २०१५ मध्ये शाहिद आणि मीरा विवाहबद्ध झाले आणि शाहिद एका मुलीचा पिता आहे.