scorecardresearch

Video: आकांक्षा दुबेच्या आत्महत्येपूर्वीचं CCTV फुटेज समोर; ‘त्या’ तरुणासह कारपासून रुममध्ये जाताना काय घडलं, तुम्हीच पाहा

Akanksha Dubey CCTV: आकांक्षा दुबेचे अखेरचे सीसीटीव्ही समोर, एका तरुणाबरोबर जाताना दिसली अभिनेत्री

Akanksha Dubey CCTV
(आकांक्षा दुबे संदीप सिंह)

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येला जवळपास एक आठवडा होत आला आहे. तिने रविवारी २६ मार्च रोजी वाराणसी इथं हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस भोजपुरी गायक समर सिंह याला तिच्या कुटुंबाने जबाबदार ठरवलं आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आता तपासादरम्यान आकांक्षाच्या आत्महत्येआधीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.

नयनज्योती सैकिया ठरला ‘MasterChef India’चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाले २५ लाख, ट्रॉफी अन्…

या व्हिडीओमध्ये रात्री उशिरा दीड वाजताच्या सुमारास आकांक्षा या एका व्यक्तीसोबत कारमधून उतरते आणि हॉटेलच्या आत जाताना दिसत आहे. यानंतर ती जिन्यावर दिसते. पायऱ्या चढल्यानंतर आकांक्षा गॅलरीत थांबते आणि तिच्या बॅगेत काहीतरी शोधताना दिसते. मधेच ती व्यक्ती तिला मदत करताना दिसत आहे. मग ती रुमच्या दिशेने जाते, सोबत असलेली व्यक्तीही पाठोपाठ जाताना यात दिसत आहे. दरम्यान, आकांक्षा दुबेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना या व्हिडीओची मदत होऊ शकेल, असं म्हटलं जातंय.

“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”

या व्हिडीओत आकांक्षाबरोबर असलेल्या तरुणाचं नाव संदीप सिंह आहे. फुटेजच्या वेळेनुसार, दोघे जवळपास १७ मिनिटं एकत्र होते. त्यानंतर संदीप हॉटेलमधून बाहेर पडतो आणि त्याच्या गाडीने निघून जातो. संदीप सिंह हा आकांक्षा आणि या प्रकरणातील आरोपी समर सिंहचा कॉमन मित्र आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी अभिनेत्रीची आई मधू दुबे कुटुंबीय व समर्थकांसह सारनाथ पोलीस ठाण्यात पोहोचल्या व तिथे गोंधळ घातला. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आणि हॉटेल व्यवस्थापनाशी संगनमत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समर सिंहने मुलीची हत्या केली आहे, पण पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 08:22 IST

संबंधित बातम्या