मराठी मालिका म्हटलं की काही ठराविक मालिकांची नावं हमखास प्रेक्षकांच्या समोर येतात. पण, सध्या एक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी झाली आहे, ती मालिका म्हणजे झी युवा वाहिनीवरील ‘लव्ह लग्न लोचा’. या मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मुख्य म्हणजे या मालिकेतील ‘सौम्या’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया गुरवही अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे. तिचे काही चाहते तर तिच्या प्रेमातच आहेत असं म्हणायला हरकत नाही. अशा या अक्षयाचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. त्यामुळे अनेक तरुणांचं हृदय तुटलं असेल यात शंका नाही. पण तिचंही कोणावर तरी क्रश होतं. आज या अभिनेत्रीच्या क्रशबद्दल जाणून घेऊया…

सेलिब्रिटी क्रश : ‘…. आणि ती अचानक निघून गेली’

सर्वसामान्य मुलींप्रमाणे सुरुवातीला माझही बॉलिवूड अभिनेत्यावरच पहिलं क्रश झालं. रितेश देशमुख मला फार आवडायचा. रितेश-जेनेलियाच्या लव्ह स्टोरीप्रमाणेच माझंही व्हावं असं मला वाटत होतं. अगदी तसंच माझं खऱ्या आयुष्यातही झालं. त्यानंतर पहिल्या भेटीतचं माझं ज्या व्यक्तीवर क्रश झालं त्याच्याशी मी लग्न केलं. त्याच नाव आहे भूषण वाणी. त्याला मी भेटले तेव्हा पहिल्याच भेटीत मला वाटलं की माझा भावी जोडीदार हाच असायला हवा. संदीप हा आमचा दोघांचाही मित्र आहे. एकदा संदीपच्या घरी मी एका चित्रपटानिमित्त गेले होते. त्यावेळी भूषण किचनमध्ये आमच्याकरता कॉफी करण्यासाठी धडपडत होता. मी आणि संदीप मात्र चित्रपटाविषयी बोलण्यात रमलो होतो. तेव्हा भूषण आमच्या तिघांसाठी कॉफी घेऊन आला. तो समोर येताच संदीप लगेच म्हणाला, हा मुलगा सिंगल आहे आणि याच्यासाठी आम्ही मुलगी शोधतोय. मग मी पण पटकन म्हणाले, अरे वा…. मला मुलगा पसंत आहे आणि कॉफी तर त्याने छानच बनवली आहे. मी अगदी मस्करीत हे वाक्य बोलून गेले होते. माझ्या मनातही तसं काही तेव्हा नव्हतं. भूषणची आणि माझी ती पहिलीच भेट होती. पण, संदीपकडे मी जे काही बोलले ते आज खरं झालंय. आज भूषण माझा जोडादार आहे.

सेलिब्रिटी क्रश : ‘माझं हे गुपित कोणालाच माहित नाही’

अक्षयाने तिच्या चाहत्यांना लग्नाची आनंदाची बातमी दिली असली तरी त्यासोबतच एक वाईट बातमीसुद्धा आहे. आता यापुढे अक्षया तुम्हाला लव्ह लग्न लोचा मालिकेत दिसणार नाही. लग्नानंतर तिने ही मालिका सोडली आहे. मात्र, काही दिवसांनी ती तुम्हाला एक मोठं सरप्राईज देणार असल्याचंही तिने सांगितलं. कदाचित ती मोठ्या पडद्यावरही दिसण्याची शक्यता असल्याचं तिनं लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं. हनीमूनला जाऊन आल्यानंतर अक्षया पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे.