scorecardresearch

Video : “माझा मुलगा चार पावलं…” लेकाची करामत अन् बायकोचा राग, कुशल बद्रिकेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अभिनेता कुशल बद्रिकेने पत्नी आणि मुलाबरोबर शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Kushal Badrike video Kushal Badrike
अभिनेता कुशल बद्रिकेने पत्नी आणि मुलाबरोबर शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. चित्रपट, कार्यक्रमाच्यानिमित्ताने कुशल प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच. पण त्याचबरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर सक्रिय असणारा कुशल पत्नी आणि मुलाबरोबरचे गंमतीशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता देखील त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : “शिवडीची केवढी ती इंग्लिश” लंडनमध्ये इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधताना सिद्धार्थ जाधवची फजिती, व्हिडीओ चर्चेत

कुशल आपल्या कामामध्ये कितीही व्यग्र असला तरी कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवणं कधीही चुकवत नाही. इतकंच नव्हे तर कुटुंबियांबरोबर तो अनेकदा धमाल-मस्ती करताना दिसतो. कुशल शेअर करत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या मुलाचाही सहभाग असतो. कुशलचा हा नवा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये कुशलची पत्नी सुनयना आपल्या मुलाला सांगते, “गंधार ऐकना पप्पांना विचारना आजचा दिवस बाहेरून जेवण मागवलं तर चालेल का?” त्यानंतर गंधार वडील कुशल यांच्याकडे जातो. तिथे तो कुशलला आईने सांगितलेला प्रश्न न विचारताच “मी मोठा होऊन काय बनू? असं विचारतो.” कुशलने उत्तर देताच तो पुन्हा आईकडे जातो आणि म्हणतो, “ते भंगार मूडमध्ये आहेत. तू जेवण घरीच बनव.”

आणखी वाचा – मराठी चित्रपटांचे प्रेक्षक आहेत कुठे? महेश मांजरेकरांना पडला प्रश्न, म्हणाले, “दाक्षिणात्य चित्रपट…”

गंधारची ही आयडीयाची कल्पना आणि प्रत्येक घरामध्ये घडणारा हा मजेशीर प्रसंग कुशलने मजेशीररित्या या व्हिडीओच्या माध्यमातून मांडला आहे. कुशलने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “आपलं मुल आपल्यापेक्षा दोन पावलांनी पुढे असावं, असं प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं. माझं जरा चार पावलं पुढचं निघालं एवढंच.” कुशलच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील पसंती मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chala hawa yeu dya actor kushal badrike share video with wife and son goes viral on social media see details kmd

ताज्या बातम्या