‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच कुशल बद्रिके हा त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत फिरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याने चक्क गुजराती भाषेत पोस्ट शेअर केली आहे.

कुशलने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो गुजरातमधील तापी नदीजवळचा आहे. या फोटोला त्याने चक्क गुजराती भाषेत कॅप्शन दिले आहे. “हुं सुरत माटा गयवानू होतू , थवे तापी नदी ना माटा फोटू खिचवानी गयवा सू , तवाना पोज. (तशी गुजराती पण सोप्पी आहे यार….)”, असे त्याने कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याची ही पोस्ट पाहून तसेच गुजराती भाषेवरील प्रेम पाहून चाहत्यांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

…म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

अभिनेत्री श्रेया बुगडे हिने कुशलच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यावर तिने ‘नाही रे…’, असे म्हटले आहे. तर अभिनेता प्रथमेश परब याने ‘अरेरे…’, असे म्हटले आहे. यासोबत अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर हसतानाचे इमोजी शेअर केले आहेत.

“पुन्हा पुन्हा सुरतच्या दौऱ्यावर या, म्हणजे तुम्हाला गुजराती पण येईल, कशी वाटली तुम्हाला आमची सुरत”, अशी कमेंट एका चाहतीने त्याच्या या पोस्टवर केली आहे.

“हुं सुरत माटा गयवानू…”, कुशल बद्रिकेची गुजराती भाषेतील ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कुशलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी त्याची ही पोस्ट पाहून हसणारे इमोजी शेअर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पांडू चित्रपटात कुशल बद्रिके झळकला होता. कुशल हा सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच ‘जत्रा 2’ चित्रपटात दिसणार आहे.