scorecardresearch

“मी काय बोलू…”, ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने अमृता खानविलकरसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील असणाऱ्या सर्व गाण्यांचे दिग्दर्शन नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि दिपाली विचारे यांनी केले आहे. नुकतंच नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील याने अमृता खानविलकरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अमृता खानविलकरच्या नृत्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याने तिला चंद्रमुखी चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

आशिष पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट

“अमू… तुझी निष्ठा, आवड आणि नृत्य शिकण्याची तीव्र भावना याबद्दल मी काय बोलू. अनेक दिवस, तासनतास चालणारी तालीम आणि तू तुझ्या ज्या उर्जेने हे गाणे केले आहे, ते पाहून मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. या गाण्याच्या शूटींगदरम्यान काढलेला हा फोटो अपलोड करण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.

मला ‘बाई ग’ गाण्याच्या दिग्दर्शनाची संधी दिल्याबद्दल आणि माझ्या कलेवर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…’चंद्रमुखी’साठी खूप शुभेच्छा आणि हो हा चित्रपट ‘सुपर से उपर वाला’ असणार आहे”, अशी पोस्ट आशिषने केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

दरम्यान ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ ही ठसकेबाज लावणी सर्वत्र चर्चेत आहे. त्यानंतर नुकतंच गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘बाई गं…’या बैठकीच्या लावणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या गाण्याला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे. ‘लावणीकिंग’ म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केले आहे. या लावणीत अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला चार चांद लागले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Choreographer ashish patil share instagram post for amruta khanvilkar talk about chandramukhi dancing experience nrp

ताज्या बातम्या