राष्ट्रीय पुरस्कार विजेता गणेश आचार्य यांचे नवीन फोटो पाहिल्यावर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. त्यांचा नवीन लूक पाहिल्यास आधीपेक्षा जवळपास निम्मे वजन त्यांनी कमी केल्याचे पाहायला मिळेल. नृत्य निर्देशक गणेश आचार्य यांनी ८५ किलो वजन कमी केले आहे.

यासंदर्भात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं. मागील दीड वर्षापासून मी फक्त माझं वजन कमी करण्यावरच भर देत होतो. २०१५ मध्ये आलेल्या माझ्या चित्रपटासाठी मी ३० ते ४० किलो वजन वाढवलं होतं आणि त्यानंतर माझं वजन २०० किलोवर पोहोचलं. आता तेच वजन मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय.’

‘लोकांनी गणेश आचार्यला जाड असल्याचंच पाहिलंय. माझी ही प्रतिमा मला बदलायची होती. आतापर्यंत मी ८५ किलो वजन कमी केले आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील ‘मस्तो का झुंड’ या गाण्यातील नृत्य निर्देशनासाठी त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

वाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच राजकपूर यांचा नातू चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वजन कमी केल्यानंतर जाणवू लागलेल्या फरकाबद्दल सांगताना ते म्हणाले की, ‘जेव्हा वजन जास्त होतं तेव्हाही मी डान्स करत होतो. मात्र आता वजन केल्याने माझी ऊर्जा वाढली आहे.’ वजन कमी करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी गणेश आचार्य लवकरच युट्यूबवर एक व्हिडिओ प्रदर्शित करणार आहेत. त्यांनी कशाप्रकारे वजन कमी केलं, त्यासाठी आहार कसा घेतला या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन ते व्हिडिओतून करताना दिसणार आहेत. याआधी गायक अदनान सामीनेही आपले वजन घटवले होते.