लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नानी याच्या आगामी ‘हिट 3’ या सिनेमाचे काश्मीरमध्ये शूटिंग झाले. पण तिथे एक दुर्दैवी घटना घडली. सिनेमाच्या काश्मीर शेड्यूलच्या शूटिंगदरम्यान एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला, त्यानंतर टीमवर शोककळा पसरली आहे. कृष्णा केआर असे तरुण महिला क्रू मेंबरचे नाव आहे. कृष्णा केआर ‘हिट 3’ चे सिनेमॅटोग्राफर सानू जॉन वर्गीस यांची सहाय्यक म्हणून काम करत होती.

कृष्णा केआरला २३ डिसेंबर रोजी छातीत संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यानंतर तिला श्रीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कृष्णा केआर बरी होत होती आणि ती तिच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलू शकत होती. प्रकृतीत सुधारणा झाल्याने सोमवारी सकाळी तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येणार होतं. पण त्याच्या अवघ्या काही तासाआधी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. कृष्णा केआर ही मूळची केरळची होती. आता केरळ पेरुम्बावूर येथे तिच्या जन्मगावी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दु:खद घटनेबद्दल चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

कृष्णा केआरच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत. वूमन इन सिनेमा कलेक्टिव्हने कृष्णाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि तिच्या मृत्यूची पुष्टी केली. “आमची प्रिय सदस्य, कृष्णा केआर हिच्या अकाली निधनाबद्दल माहिती देताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना छातीत संसर्ग झाला, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. कृष्णा ही उत्तम सिनेमॅटोग्राफर होती. ती तिच्या योगदानासाठी कायम आमच्या स्मरणात राहील,” असं कॅप्शन त्यांनी दिलं.

हेही वाचा – “मी वैतागलो आहे”, अनुराग कश्यपने घेतला मुंबई सोडण्याचा निर्णय; म्हणाला, “मला जिथे काम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिट 3’ चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘हिट’ फ्रँचायझीची तिसरा भाग आहे. ‘हिट’ आणि ‘हिट 2’ सुपरहिट ठरले होते, त्यानंतर आता ‘हिट 3’चे शूटिंग वेगाने सुरू आहे. या चित्रपटात नानी मुख्य भूमिकेत आहे. सैलेश कोलानूने याचे दिग्दर्शन केले आहे. काश्मीरमधील सुंदर लोकेशन्सवर चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, केजीएफ फेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, आदिवी सेश, निवेथा थॉमस आणि आदिल पाला या कलाकारांची मांदियाळी आहे.