ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने आपल्या विविधांगी भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात मोठे योगदान देणारे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, विनोद खन्ना यांनी विविधांगी भूमिका केल्या. खलनायक, नायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका करताना त्यात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यासोबतच भाजपचे गुरूदासपूरचे खासदार आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. विनोद खन्ना यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असणारा कलावंत आपण गमावला आहे.
Saddened to know about the demise of one of the greatest legends of Indian Cinema, Former Union Minister and BJP MP @VinodKhanna ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2017
देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरीक्त अरुण जेटली, राजनाथ सिंह, आशिष शेलार, विनोद तावडे, नितिन गडकरी यांसह अनेक नेते मंडळींना विनोद खन्ना यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
Condolences on sad demise of veteran actor & BJP MP Shri #VinodKhanna ji, may God render peace to the departed soul & solace to his family.
— Arun Jaitley (@arunjaitley) April 27, 2017
Our silver screen loses its shine as we bid a final adieu to legendary actor and former MP #VinodKhanna ji. May peace be upon him.
— Vinod Tawde (@TawdeVinod) April 27, 2017
I deeply mourn the demise of senior @BJP4India parliamentarian Vinod Khanna, a versatile film personality and a great human being
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 27, 2017
Shri Vinod Khanna had an illustrious career in films and politics. He carved a special place in the hearts of millions of Indians. 1/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 27, 2017
With the demise of Vinod Khannaji the people of India have lost a fabulous actor and sensitive politician. May his soul rest in peace. 2/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 27, 2017