‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला आर्थिक मदत त्यांनी केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण मुलावर उपचार करण्याइतकी हर्णे यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मित्रमंडळी-ओळखीच्यांकडून आर्थिक मदत मिळवून उपचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना काही पैसे मिळाले नाहीत. उपचाराअभावी मुलाची तब्येत खालावत होती.अखेर त्यांनी त्यांच्या परिचयाचे असलेले दिग्दर्शक अमोल भावे यांना मदतीसाठी संपर्क साधला. भावे यांनी हर्णे यांना मंगेश देसाई यांच्याशी जोडून दिले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंगेश देसाई यांनी मदत करण्याचे आश्वासन न देता लगेचच उपचार सुरू करून दिले. त्यानंतर मुलाची तब्येत सुधारल्यावर आणि डॉक्टरांनी रुग्णालयातून सोडताना रुग्णालयाचे बिलही भरले.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

याबाबत हर्णै म्हणाले, की मुलावर व्यवस्थित उपचार होऊन तो सुखरूप घरी परत आला याचा आनंद आहे. या काळात मंगेश देसाई सातत्याने संपर्क साधत होते, मुलाच्या तब्येतीची चौकशी करत होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर मदत केल्याबद्दल आभार मानण्यासाठी यांनी मंगेश देसाई यांना फोन केला. त्यावेळी ते म्हणाले, की मी केवळ निमित्तमात्र आहे, ही आर्थिक मदत मी नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश देसाई यांचे आभार शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी त्यांचा जीवनभर ऋणी राहीन.