चाकोरीबाहेरील विषय हाताळून मराठी चित्रपटविश्व प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल आणि हिंदी सिनेसृष्टीला टक्कर देत आहेत. सध्याची युवा पिढी आवर्जून मराठी चित्रपट पहायला अगदी पहिल्याच दिवशी हजेरी लावतात. याच आधारे वंडलॅण्ड फिल्म्सतर्फे ‘coming सून’ हा मनोरंजनात्मक प्रेमपट लवकरच येत आहे.
मनोरंजनासह प्रेमाची जुगलबंदी करण्यासाठी आदीनाथ कोठारे, नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी. विजय पाटकर, रेशम टिपणीस, सुहास जोशी, आंचल पोद्दार हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. अंकुश काककर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, पटकथा आणि संवाद चिन्मय कुलकर्णी यांनी लिहले आहेत. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उमेश जाधवकडे देण्यात आली आहे. मुंबई-पुणे या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण होणार असून सध्या पुण्यातील राजगुरुनगर येथे चित्रीकरण सुरु आहे. ‘coming सून’ लवकरच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘coming सून’
चाकोरीबाहेरील विषय हाताळून मराठी चित्रपटविश्व प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल आणि हिंदी सिनेसृष्टीला टक्कर देत आहेत.

First published on: 04-07-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coming suun