Entertainment News Updates : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. १४ ऑग्स्ट रोजी रजनीकांत यांचा ‘कुली’ आणि हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांचा ‘वॉर २’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. परंतु, सध्या ‘कुली’ चित्रपटाची चर्चा अधिक असल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहतं कळतं. ‘कुली’ने पहिल्या दिवशी ६५ कोटींची कमाई केलेली तर आता पर्यंत या चित्रपटाने २०० कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. ‘वॉर २’ बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने गुरुवारी १४ ऑग्स्टला ५२ कोटी तर दुसऱ्या दिवशी ३३.२५ कोटींचा गल्ला जमावला होता. आता पर्यंत या चित्रपटाने एकूण १८३.५ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. आता या दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शनाच्या ६व्या दिवशी किती कलेक्शन केलं? हे जाणून घेऊयात…
रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींचा गल्ला जमावला. १९ ऑग्स्ट ६व्या दिवशी या चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ९.५० कोटींची कमाई केली असून ‘कुली’ने प्रदर्शनानंतर ६ दिवसात एकूण २१६ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर दुसरीकडे हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ची ६व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ८.२५ कोटी इतकं असून या चित्रपटाचं आतापर्यंत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे १९२.७५ कोटी इतकं आहे. त्यामुळे ‘कुली’ व ‘वॉर २’ मध्ये सध्या ‘कुली’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ‘वॉर २’ पेक्षा अधिक असल्यचं समजतं.
Entertainment News Updates
"घोडबंदरच्या ट्रॅफिकमुळे आमच्या दोघांमधील…", 'तारिणी' फेम शिवानी सोनार सहअभिनेत्याबरोबरच्या बॉण्डिंगद्दल म्हणाली…
बॉलीवूडचं प्राणीप्रेम! 'या' चित्रपटांत आहे माणूस आणि श्वानांचं खास नातं, तुम्ही पाहिलेत का?
"…अन् शाहरुख खानने फरशी पुसली"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले, "त्या व्यक्तीला लाज वाटते की…"
'प्लास्टिक सर्जरीची दुकान' म्हणणाऱ्यांना श्रुती हासनने दिलं सणसणीत उत्तर; म्हणाली, "माझे निर्णय…"
आमिर खानला विवाहबाह्य संबंधातून मूल; भाऊ फैजल खानचा दावा, DNA टेस्टची मागणी, म्हणाला, "माझ्याकडे पुरावे…"
गश्मीर महाजनी लवकरच ‘बिग बॉस’मध्ये दिसणार? शोमधील सहभागाबाबत व्यक्त केली इच्छा, नेमकं काय म्हणाला? पाहा…
'ढाई किलो का हात' या डायलॉगमुळे सनी देओलची व्हायची चिडचिड; म्हणाला, "जिथे जाऊ तिथे…"
"…म्हणून कृतिकाची एन्ट्री झाली", 'लपंडाव' मालिकेत सायली संजीव नसल्याबद्दल चेतन वडनेरे म्हणाला, "मी आणि सायली…"
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? प्रतिक्रिया देत म्हणाली, "मला स्वत:साठी वेळ..."
Video : "…तर प्रत्येक जण समलैंगिक असेल", अभिनेत्री स्वरा भास्करचे वक्तव्य; 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
"रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा…", सुमीत राघवनची 'ती' पोस्ट चर्चेत; म्हणाला, "आपल्या देशात…"
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील 'हे' सेलिब्रिटी
फोटोमधील 'या' चिमुकलीला ओळखलंत का? 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये साकारलेली महत्त्वपूर्ण भूमिका; बालपणीची 'ती' आठवण केली शेअर
Video: "तिच्या प्रेमाशिवाय २१ वर्षे पोरकं..", २० वर्षानंतर पुन्हा दागिने चोरल्याचा आशावर होणार आरोप अन् सूर्या…; मालिकेत ट्विस्ट
"माझी आई घरकाम करायची, ३ दिवसांचं शिळं जेवण…", भारती सिंगला आठवले संघर्षाचे दिवस, २ वर्षांची असताना वडिलांचं झालेलं निधन
"सुरुवातीला काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण…", सई मांजरेकरने सांगितला इंडस्ट्रीमध्ये काम करतानाचा अनुभव; म्हणाली…
Video: आलिया भट्टच्या ड्रग्ज विरोधी व्हिडीओवर वाईट कमेंट्स आल्यानंतर NCB ने घेतला 'हा' निर्णय; नेमकं घडलं काय?
भारती सिंगबरोबर बसमध्ये दुधवाल्याने केलेले घाणेरडे कृत्य; म्हणाली, "मला घट्ट पकडले अन्…"
"लाज वाटायला हवी…", अनुराग कश्यपची संतापजनक पोस्ट; AI च्या साह्याने चित्रपट बनवणाऱ्यांवर केली जोरदार टीका, म्हणाला, "निंदनीय…"
पावसामुळे सेटला वॉटर पार्कचं स्वरूप, 'कोण होतीस तू…' मालिकेच्या कलाकारांचा चक्क ट्रकने प्रवास; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
"पहाटे ४ ला थंडगार पाण्यात सलग ३ दिवस…", 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड फोटो शेअर करत म्हणाला, "अजूनही अंगात…"
'देवमाणूस'मधून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एक्झिट, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, "शेवटपर्यंत…"
Video : शाहरुख खानच्या घरात डिलिव्हरी बॉय म्हणून घुसण्याचा केला प्रयत्न; पण घडलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
'मुंबईचा फौजदार'च्या रिमेकमध्ये तू आणि प्राजक्ता माळी एकत्र दिसणार का? गश्मीर महाजनी म्हणाला, "मी रिमेक बनवेन; पण, ती…"
सायलीला आठवला भूतकाळ, 'ते' दृश्य पाहताच जोरात किंचाळली…; अर्जुन शोधणार बायकोची खरी ओळख, 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट
काजोलच्या ‘माँ’सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज होणार प्रदर्शित…
Coolie vs War 2 collection: रजनीकांत यांच्या ‘कुली’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ला टाकलं मागे; ६व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
१४ ऑग्स्ट रोजी प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या 'कुली' व हृतिक रोशनच्या 'वॉर २'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. परंतु, बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत 'कुली' चित्रपटाने 'वॉर २' ला मागे टाकलं असल्याचं त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईतून समजतं. 'कुली' चित्रपटाने प्रदर्शनानंतर ६ दिवसात तब्बल २१६ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे तर 'वॉर २' ने आतापर्यंत ६ दिवसात १९२.७५ कोटी इतकं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.
Coolie vs War 2 collection: रजनीकांत यांच्या ‘कुली’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ला टाकलं मागे; ६व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
१४ ऑग्स्ट रोजी प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या 'कुली' व हृतिक रोशनच्या 'वॉर २'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. परंतु, बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत 'कुली' चित्रपटाने 'वॉर २' ला मागे टाकलं असल्याचं त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईतून समजतं. 'कुली' चित्रपटाने प्रदर्शनानंतर ६ दिवसात तब्बल २१६ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे तर 'वॉर २' ने आतापर्यंत ६ दिवसात १९२.७५ कोटी इतकं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.