क्रिकेटविश्वात नावाजलेला विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांभोवती नेहमीच प्रसारमाध्यमांचा गराडा असतो. एका प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी असल्यामुळे सारा आणि सचिनच्या इतर कुटुंबियांना बऱ्याचदा बॉलिवूड आणि काही सेलिब्रिटी पार्ट्यांना हजेरी लावण्याची संधी मिळते. अशाच एका पार्टीमध्ये सारा तेंडुलकरच्या उपस्थितीने काही दिवसांपूर्वी अनेकांचेच लक्ष वेधले. या पार्टीमध्ये अभिनेता रणवीर सिंगने सुद्धा हजेरी लावली होती. बी-टाऊनच्या या हॅण्डसम हंकला पाहून अनेकांनाच सेल्फी काढण्यापासून स्वत:ला अडवता येत नाही. साराचेसुद्धा असेच काही झाले आणि तिने बॉलिवूडच्या बाजीरावसोबत सेल्फी काढला आणि तिच्या या सेल्फीने सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधाण आले.
रणवीरसोबत सेल्फी काढतानाचा साराचा हा सेल्फी पाहून अनेकांनाच विशेषत: रणवीरच्या फिमेल फॅन्सना तिचा हेवा वाटत असणार यात शंकाच नाही. काही दिवसांपू्र्वीच एका व्हिडिओमध्ये रणवीर सिंगसोबत सचिन तेंडुलकरलासुद्धा पाहायला मिळाले होते. एका जाहिरातीच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आल्याचे म्हटले जात होते. त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी ‘हमे पार्टी करने जाना है… चलो चलो’, असेही ते म्हणताना दिसत आहेत.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीरविषयी बोलायचे झाले तर सध्या तो आगामी, ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी हा चित्रपट एक पर्वणीच असणार ठरणार हे नक्की.