बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सलमान या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘दंबंग ३’ साठी सलमानने आपल्या ट्विटर हँडलचे नाव देखील बदलले आहे. त्याने ट्विटर हँडलला ‘चुलबुल पांडे’ असे नाव दिले आहे.
‘चुलबुल पांडे’ ही दंबंग चित्रपट मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. “नमस्कार, माझे नाव चुलबुल पांडे, तुम्हाला भेटुन आनंद झाला.” असे ट्विट करुन त्याने आपल्या नव्या नावाची माहिती चाहत्यांना दिली. सलमानने केलेल्या या ट्विटला सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्धी मिळत आहे. या ट्विटला चार हजारांपेक्षा अधिकांनी रिट्विट केले असुन तब्बल २९ हजार नेटकऱ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Hello! My name is Chulbul Pandey.
Nice to meet you! #Dabangg3WithChulbulPandeyhttps://t.co/veZjWKAwyp @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019
हा चित्रपट दंबंग चित्रपट मालिकेतील तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चाहते आता दंबंग ३ पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.