कोरिओग्राफर आणि डान्सर अशी ओळख असणारा धर्मेश येलांडे आज घराघरात प्रसिद्ध आहे. धर्मेश येलांडेपेक्षाही ‘धर्मेश सर’ या नावाने त्याला अधिक ओळखलं जातं. ‘डान्स इंडिया डान्स’मधून धर्मेश हा खरा प्रसिद्धीझोतात आला. धर्मेश हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. मात्र नुकतंच धर्मेशने त्याचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मेशने काही तासांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने हॅक असे लिहिले आहे. त्यासोबत त्याने अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “मला वाटते की माझे खाते हॅक झाले आहे. ते खाते पुन्हा सुरु होताच तुम्हाला अपडेट देण्यात येईल.” दरम्यान धर्मेशने त्याचे नेमकं कोणतं अकाऊंट हॅक झालं? याची माहिती अद्याप दिलेली नाही.

धर्मेशच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहे. यात त्याच्या अनेक चाहत्यांनी ‘हे कसं झाले?’, ‘खरं आहे का?’ असे प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी ‘हा प्रमोशनचा एखादा भाग’ असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान धर्मेशने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याची ही पोस्ट खरी आहे की प्रमोशनचा भाग याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या या पोस्टमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

धर्मेश हा रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आला. त्यानंतर पुढे त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमामुळे धर्मेश हे नाव प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमानंतरच धर्मेशचा खरा प्रवास सुरु झाला. धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. धर्मेशने यापूर्वी ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध ‘बुगी वुगी’ शोमध्येही सहभाग घेतला होता.

“शूटींगदरम्यान माझे वडील आजारी पडले होते पण…”, ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाविषयी रणबीर कपूरचा खुलासा

कोरिओग्राफर आणि डान्सर अशी ओळख असलेल्या धर्मेश येलांडे काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून झळकला होता. त्यापूर्वी धर्मेशने हिंदी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance india dance fame dharmesh yelande account hacked share photo on instagram nrp
First published on: 17-03-2022 at 08:45 IST