scorecardresearch

“…फ्लॉवर नहीं फायर है”, म्हणतं डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नरने या आधी ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला होता तर त्याच्या मुलींनी ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स केला होता.

david warner, david warnr daughter,
डेव्हिड वॉर्नरने या आधी 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स केला होता तर त्याच्या मुलींनी 'सामी सामी' गाण्यावर डान्स केला होता.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचे भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचेही त्याला वेड आहे. तो सतत या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता वॉर्नरने सध्या चर्चेत असणारा चित्रपट ‘पुष्पा’मधील एका डायलॉगवर व्हिडीओ शेअर केले आहे. त्याने शेअर केलेले हे रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डेव्हिड वॉर्नरसोबत त्याची मुलगी देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये डेव्हिड वॉर्नर “पुष्पा नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..!” या अल्लू अर्जूनच्या डायलॉगवर लिपसिंग करताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची मुलगी देखील लिपसिंग करताना दिसते. डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

आणखी वाचा : इंटरनेट स्पीडवरून रितेशने जिनिलियाला मारला टोमणा, पाहा मजेशीर व्हिडीओ

या आधी देखील डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत डेव्हिड वॉर्नरने ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर त्याच्या तिन्ही मुलींनी याच चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: David warner daughter joins him in another pushpa video went viral dcp

ताज्या बातम्या