बॉलिवूडमधून हॉलिवूडच्या चित्रपटात प्रियांकाला टक्कर देणाऱ्या दीपिकाने आणखी एक मिरविला आहे. दीपिकाने प्रियांकाला मागे टाकत “सेक्सिएस्ट एशियन वुमन” चा किताब पटकविला आहे. आपल्या सौंदर्याची जादू बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये दाखवून देणाऱ्या दीपिकाने पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळविला आहे. मागील दोन वर्षापासून या पुरस्कारासाठी प्रियांकाची वर्णी लागत होती. प्रियांकाला धोबी पछाड करत दीपिकाने यंदाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ब्रिटन स्थित वर्तमानपत्र ‘इस्टर्न आय’च्या सौजन्याने दरवर्षी आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या सौंदर्यवतीला या पुरस्काराने गोरविण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशियातील सर्वाधिक सौंदर्यवतीची निवड करण्यासाठी इस्टर्न आय च्या वतीने जनमत कौल घेण्यात आला होता.यामध्ये दीपिकाने सर्वाधिक मते मिळविली. मागील दोन वर्षापासून या पुरस्कारावर कब्जा करणाऱ्या प्रियांकाला जनमत कौलच्या निकालानुसार दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जवाई राजा या मालिकेमध्ये रोशनी खुरानाची भूमिका साकारणाऱ्या निया शर्माला तिसरे स्थान मिळाले आहे. तर छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या दृष्टी धामी या अभिनेत्रीला चौथे स्थान मिळाले आहे. तर डिअर जिंदगी या चित्रपटातून शाहरुखसोबत शेअर स्क्रिन करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्यावर आपली जादू निर्माण करणाऱ्या आलिया भट्टला या यादीत पाचवे स्थान मिळाले.

हॉलिवूडमधून दमदार पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय आणि प्रभावी भूमिका साकारत आपली छाप उमटवणारी दीपिका ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटातुन हॉलिवूडमधील प्रवास सुरु करणार आहे. पहिल्यांदा या पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे दीपिकाचा आनंद गगनाला भिडला आहे. आपल्याला मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबाबत बोलताना ‘सेक्सी’ या शब्दाचा अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा असल्याचे मत दीपिकाने न म्हटले. माझ्यासाठी ‘सेक्सी’ हा शब्द फक्त शरिरापुरता मर्यादीत नसून आत्मविश्वास आणि सौम्यता यांना जोड देणारा असल्याचे दीपिकाने व्यक्त केले.  या पुरस्काराच्या पहिल्या दहामध्ये सनाया ईरानी सहाव्या, कतरिना कैफ सातव्या, सोनम कपूर आठव्या, माहिरा खान नवव्या तर गौहर खान दहाव्या स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी  यांनी संपादकांच्या निवडीतून स्थान मिळविले आहे. मागील १३ वर्षातून पहिल्यांदा या यादीत स्थान मिळविणाऱ्या नीता अंबानी  ३२ व्या स्थानावर आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone left behind priyanka chopra and became sexiest asian woman in the world
First published on: 08-12-2016 at 19:39 IST