दीपिका पदुकोणचा हा अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल

याआधीही दीपिकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत

दीपिका पदुकोण

आपल्या हरहुन्नरी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या दीपिका पदुकोणचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती दमदार अॅक्शन सीन देत आहे. हा व्हिडिओ तिच्या आगामी हॉलिवूड सिनेमा ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’मधला आहे.

याआधीही या सिनेमातले दीपिकाचे अनेक लुक आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. पण या व्हिडिओमधली तिची अॅक्शन पाहता तिचे फॅन्स मात्र नक्कीच खुष होतील यात काही वाद नाही. या सिनेमात दीपिका स्टंटसोबत अनेक हॉट सीन देतानाही दिसत आहे. दीपिकासोबत या सिनेमात हॉलिवूडचा दमजार अभिनेता विन डिझेलही दिसणार आहे.
सिनेमाचे शुटिंग संपले असून पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपिका सध्या मुंबईमध्ये असून संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’च्या तयारीमध्ये लागली आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमातही दीपिकाची भूमिका दमदार असणार असे सांगितले जात आहे.

सिनेमाच्या फर्स्ट लूकपासून ते त्याच्या लोगोपर्यंत दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्ट्समुळे सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता लागून राहिली आहे. याच उत्सुकतेत भर घालत विन डिझेलने दीपिकाबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो दीपिकाकडून हिंदीचे धडे घेताना दिसत आहे.
हॉलिवूड स्टार विन डिझेज याने फेसबूकवर लाईव्ह होत याची माहिती दिली. दीपिका माझी चांगली मैत्रिण आहे, अशी त्याने सुरुवात केली. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका कोण आहे, हे संपूर्ण जगाला कळेल, अशा शब्दांत विनने दीपिकाची स्तूती केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone looks like a bomb in this new video

ताज्या बातम्या