राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची याआधीही काही गाणी प्रदर्शित झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांच्या आवाजातील ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं.

आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?

आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हे गाणं ऐका असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीस म्हणाल्या, “तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. हे या दिवसासाठी अगदी परफेक्ट गाणं आहे. हे गाणं ऐका आणि बघा”. अमृता यांचा हटके अंदाज या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. अमृता यांनी हे गाणं गाण्याबरोबरच यामध्ये डान्सही केला आहे. शिवाय या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता.

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण नेटकऱ्यांनी मात्र हा व्हिडीओ पाहून अमृता यांना ट्रोल केलं आहे. हे गाणं ऐकल्यावर कानाचे पडदे चेक करा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्रामध्ये असलं काही चालणार नाही, देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी वाईट वाटतं अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अमृता यांनी याआधीही अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॅंकर असलेल्या अमृता यांना गाण्याची विशेष आवड आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.